सोलापूर ग्रामीणमध्ये पुन्हा कोरोनाचे सहा बळी ! 'या' गावात सापडले 137 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे
Saturday, 25 July 2020

ठळक बाबी... 

 • जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये आतापर्यंत झाल्या 20 हजार 464 टेस्ट 
 • ग्रामीण भागात आतापर्यंत आढळले दोन हजार 666 कोरोना पॉझिटिव्ह 
 • आज एकूण एक हजार 375 व्यक्‍तींची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट; 137 व्यक्‍तींना कोरोनाची लागण 
 • ग्रामीणमध्ये आज सहा जणांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या आता 69 वर 
 • एक हजार 668 रुग्णांवर सुरु आहेत उपचार; आज 84 रुग्णांना सोडले घरी
 • माणिक पेठेतील पुरुष (अक्‍कलकोट), वैराग येथील दोन महिला, कुसळंब येथील पुरुष, ख्वाजा नगर झोपडपट्टीतील महिला (बार्शी) व रोहिदास चौक, पंढरपुरातील पुरुषाचा मृत्यू

सोलापूर : ग्रामीण भागातील एक हजार 375 व्यक्‍तींपैकी 137 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे आज सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामध्ये अक्‍कलकोट व पंढरपुरातील प्रत्येकी एक तर बार्शीतील चौघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील दोन हजार 666 व्यक्‍तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून कोरोनामुळे 69 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अक्‍कलकोटमधील विठ्ठल मंदिराजवळ, डबरे गल्लीत प्रत्येकी एक, करमाळ्यातील फंड गल्लीत पाच, वेताळ पेठ, अळसुंदे, सालसे येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. माढा तालुक्‍यातील रिधोरे, पडसाळीत प्रत्येकी एक, मोहोळ तालुक्‍यातील अनगरमध्ये चार, कामती बु.मध्ये तीन, खंडाळी व कोरवलीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. उत्तर सोलापुरातील पडसाळीत दोन, हिरजमध्ये तीन व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. पंढरपुरातील अनिल नगर, डाळे गल्ली, गाताडे प्लॉट, घोंगडे गल्ली, गोविंदपुरा, इसबावी, नवी पेठ, सांगोला रोड, सह्याद्री नगर, सिध्दीविनायक सोसायटी, आंबे, कोर्टी येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. पंढरपुरातील कदबे गल्लीत तीन, अंबाबाई पटांगण व ज्ञानेश्‍वर नगरात प्रत्येकी दोन, गांधी रोड परिसरात चार, रेल्वे कॉलनीत पाच, संत पेठेत सहा, विठ्ठल हॉस्पिटल क्‍वार्टर दोन, देगावमध्ये आठ, सरकोलीत पाच रुग्ण सापडले आहेत. सांगोल्यातील जवळा येथे एक, जुनोनी आणि वाझरे येथे प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत. दक्षिण सोलापुरातील कंदलगाव व हत्तुरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण, बार्शीतील आडवा रस्ता, अलिपूर रोड, बागवान प्लॉट, बारंगुळे प्लॉट, धनगर, हांडे गल्ली, जावळे प्लॉट, लोखंड गल्ली, मलिक चौक, मुळे प्लॉट, पाटील चाळ, पाटील प्लॉट, चवळे गल्ली, धोत्रे, हळदुगे, इर्ले, पानगाव, सर्जापूर, सासुरे येथे प्रत्येकी एक आढळला आहे. भवानी पेठ, बुरुड गल्लीत प्रत्येकी तीन, सिध्देश्‍वर नगरात दोन, वाणी प्लॉटमध्ये चार, जामगावमध्ये नऊ, वैरागमध्ये 11 रुग्ण सापडले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या 
अक्‍कलकोट 426, बार्शी 665, करमाळा 68, माढा 96, माळशिरस 108, मंगळवेढा 64, मोहोळ 192, उत्तर सोलापूर 215, पंढरपूर 310, सांगोला 36, दक्षिण सोलापूर 486 असे एकूण दोन हजार 666 रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत. 

ठळक बाबी... 

 • जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये आतापर्यंत झाल्या 20 हजार 464 टेस्ट 
 • ग्रामीण भागात आतापर्यंत आढळले दोन हजार 666 कोरोना पॉझिटिव्ह 
 • आज एकूण एक हजार 375 व्यक्‍तींची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट; 137 व्यक्‍तींना कोरोनाची लागण 
 • ग्रामीणमध्ये आज सहा जणांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या आता 69 वर 
 • एक हजार 668 रुग्णांवर सुरु आहेत उपचार; आज 84 रुग्णांना सोडले घरी
 • माणिक पेठेतील पुरुष (अक्‍कलकोट), वैराग येथील दोन महिला, कुसळंब येथील पुरुष, ख्वाजा नगर झोपडपट्टीतील महिला (बार्शी) व रोहिदास चौक, पंढरपुरातील पुरुषाचा मृत्यू

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six victims of corona in Solapur rural area and 137 positives