
इस्लामपूर : रस्त्याकडेने पायी निघालेल्या दोघांना चारचाकी गाडीने दिलेल्या जोराच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. दुसरी व्यक्ती गंभीर जखमी आहे. वसंत रामचंद्र बोरगे (वय ४०, बोरगेवाडी, ता. शिराळा) असे मृताचे नाव आहे. आक्काताई रामचंद्र बोरगे (वय ६०) या गंभीर जखमी आहेत. चारचाकी वाहन चालक संतोष शामराव होनमोरे (सलगरे, ता. मिरज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.