esakal | वाळू माफियांकडून अधिकाऱ्यांवर दगडफेक; हुक्केरीतील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

वाळू माफियांकडून अधिकाऱ्यांवर दगडफेक; हुक्केरी तालुक्यातील घटना

वाळू माफियांकडून अधिकाऱ्यांवर दगडफेक; हुक्केरी तालुक्यातील घटना

sakal_logo
By
टीम ई सकाळ

हुक्केरी : तालुक्यात चिलभावी येथे अवैध वाळू साठा केलेल्या ठिकाणी खाण व भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून एक लॉरी ताब्यात घेतली. त्यानंतर नजीकच्या एका अवैध वाळू साठ्यावर छापा टाकताना वाळु माफिया टोळीने गुरूवारी (ता. १०) अधिकाऱ्यांवर दगडफेक केल्याने वाहनांच्या काचा फुटून वाहनाचे नुकसान झाले आहे.

तालुक्यात हिडकल डॅम बॅक वॉटर भागात बेकायदेशीर वाळू साठा होत असल्याची माहिती खाण व भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. पण वाळू साठा करणाऱ्या 20 जणांच्या टोळीने वाहनावर दगडफेक केली. जीवाच्या भीतीने अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. कर्तव्यात अडथळा व जमिनीचे नुकसान केल्याच्या पार्श्वभूमीवर यमकनमर्डी पोलिस ठाण्यात हे प्रकरण दाखल केले आहे. याबाबत खाण व भूगर्भ खात्यासह पोलिस अधिकारी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा: वन्यप्राण्यांच्या भीतीने 712 हेक्टर जमीन पडीक

अवैध वाळू साठ्यासाठी वापरलेले वाहन ताब्यात घेतले आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेला नाही. त्याविषयी तपास सुरु आहे. जमिनीच्या नुकसानीबद्दल गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना सांगितले आहे.

- डॉ. डी. एच. हुगार, तहसीलदार, हुक्केरी.