मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सांगलीतील घटना

एलसीबी-वनविभागाची कारवाई; धुळगावमध्ये टाकला छापा
मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सांगलीतील घटना

सांगली : मांडूळ या दुर्मिळ सापाची तस्करी (smuggling of snake) केल्याप्रकरणी धुळगाव (ता. तासगाव) येथील दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (Local Crime Investigation Department) आणि तासगाव वनविभाग या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. तनवीर रहामन कामिरकर (वय २४) व फिरोज सलीम मुजावर (वय २४ दोघे रा. धुळगाव, ता. तासगाव, सांगली) अशी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे आहेत. (snake smuggling found two person in sangli arrested police)

याबाबत माहिती अशी, फरारी आरोपींच्या शोध घेणे व अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनिषा दुबुले यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार केले आहे. (sangli police) या पथकामार्फत तासगाव विभागातील फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलींग सुरू होते. त्यावेळी तासगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुळगाव येथे फिरोज मुजावर याच्या शेतीतल शेडमध्ये निळ्या रंगाच्या बॅरेलमध्ये मांडुळ जातीचा दुर्मीळ साप अवैधपणे बाळगला (crimenews)असल्याची माहिती पोलिस हवालदार अजय बेंद्रे यांना मिळाली.

मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सांगलीतील घटना
मुलासह आईवडिलांना कोरोनाने गाठलं; 13 तासांत तिघांचा मृत्यू

त्यानुसार एलसीबीचे सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस यांनी तासगाव वनविभाग अधिकारी वनक्षेत्रपाल कौशला भोसले यांना सदर कावाईसाठी बोलवून घेतले. संयुक्त पथकामार्फत फिरोज मुजावर याच्या शेतात शेडमध्ये छापा टाकला. तिथे तनवीर कामिरकर व फिरोज मुजावर हे दोघेजण आढळले. तेथील शेडमध्ये निळ्या रंगाच्या बॅरेलमध्ये मांडूळ जातीचा दुर्मिळ साप सापडला. पंचनामा करून वनविभाग अधिकारी वनक्षेत्रपाल कौशला भोसले यांनी तो जप्त केला. तनवीर कामिरकर व फिरोज मुजावर या दोघांना बेकायदेशीर मांडूळ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास तासगाव वनविभाग अधिकारी करत आहेत.

या कारवाईत पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक फडणीस, सतिश आलदर, सचिन कुंभार, संदीप नलावडे, प्रशांत माळी, अजय बेंद्रे तसेच तासगाव वनविभाग अधिकारी वनक्षेत्रपाल भोसले, रवींद्र कोळी, दत्तात्रय बोराडे यांनी सहभाग घेतला.

मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सांगलीतील घटना
कोरोनासाठी अनोखा ‘इलेक्ट्रिक मास्क’; शुद्ध हवेसाठी उपयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com