म्हणून शिराळ्यातील  सहा गावे सील, रस्ते बंद 

download (3).jpg
download (3).jpg
Updated on

शिराळा, (सांगली) ः निगडी (ता. शिराळा) येथे मुंबईहुन आलेल्या 23 वर्षीय युवतीचा कोरोना विषाणू अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गाव पुर्णतः लॉक डाऊन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने 12 पथकांच्या माध्यमातून गावात घरोघरी सर्व्हे सुरू केला आहे.

निगडीसह परिसरातील 6 गावे प्रशासनाने सील केले आहेत. शिराळा येथील सदगुरू आश्रम शाळेत संस्थात्मक विलगीकरणं केलेल्या त्या 12 जणांचे स्वॅब मिरज येथे आज पाठवण्यात आले आहेत. सागाव येथील दोघांचा आवाहल निगेटिव्ह आला आहे. मिरजेत असणाऱ्या त्या 5 जणांच्या आवाहालाची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.

आज सकाळ पासून आशा स्वयंसेवीका, गट प्रवरत,परिचारिका,आरोग्य सहायक,सेविका, यांची 12 पथके तयार करून घरोघरी सर्व्हे सुरू केला आहे. ग्राम पंचायत मार्फत गावात धूर व औषध फवारणी सुरू आहे. तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल,सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी गावातील यंत्रणा सतर्क करून लोकांना धीर दिला आहे.

निगडी येथील युवती व तिचा चुलत भाऊ हे आपल्या कुटुंबासमवेत स्वतः च्या मालकीच्या चारचाकी वाहनातून 17 एप्रिल रोजी गावी आले होते. त्यांना ताप आल्याने इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांनी उपचार सुरू होते. 

त्यांची मुंबईहून आल्याची पार्श्वभूमी व आजाराची लक्षणे कोरोना सदृश्‍य असल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आले. त्यांनी या रुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेस कळवली. त्यानंतर या रुग्णांना उपजिल्हा रुग्णाल इस्लामपूर येथे दाखल केले. नंतर तेथून त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले.

तेथे त्यांची कोरोना टेस्ट घेतली होती. त्यात युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. शनिवारी रात्रीच निगडी गावाकडे येणाऱ्या औंढी, पाडळी, अंत्री बु. निगडी फाटा शिरशी व करमाळे गावाकडील येणारे रस्ते प्रशासनने सील केले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com