तर आज नगर जिल्हा कोरोनामुक्त झाला असता... तिसऱ्या रूग्णाचाही डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

पहिले दोन रूग्ण दुबईतून आले होते. तेव्हाच त्यांना लागण झाली होती. त्यातील एक डॉक्टर होता तर दुसरा व्यावसायिक. तिसरा रूग्णही डॉक्टर आहे. तो रूग्णही आता बरा झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील तिघेही ठणठणीत बरे झाले.

नगर-  नगरचे जिल्हा प्रशासन, पोलिस व वैद्यकीय पथकाने केलेल्या परिश्रमामुळे तिसरा कोरोना बाधित रूग्ण अपेक्षेप्रमाणे शेवटच्या अहवालातही निगेटीव्ह आला. आतापर्यंत दोघांना ठणठणीत बरे झाल्याने डिस्चार्ज दिला आहे. तिसरा रूग्णही काही कालावधीतच घरी जाईल. 

पहिले दोन रूग्ण दुबईतून आले होते. तेव्हाच त्यांना लागण झाली होती. त्यातील एक डॉक्टर होता तर दुसरा व्यावसायिक. तिसरा रूग्णही डॉक्टर आहे. तो रूग्णही आता बरा झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील तिघेही ठणठणीत बरे झाले. त्यानंतर मात्र, तबलिगींमुळे मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढले. तो आकडा २६पर्यंत गेला. दिल्लीतील कार्यक्रमामुळेच ही रूग्णसंख्या वाढली. श्रीरामपूरच्या रूग्णालाही जिल्ह्याबाहेरच बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा - जिल्ह्यात ही झाली हॉटस्पॉट पॉकेट

दुसऱ्या टप्प्यातील लोकांना लागण झाली नसती तर आज नगर जिल्ह्या कोरोनामुक्त झाला असता. परंतु परदेशी नागरिकांमुळे ही संख्या वाढत गेली.

जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे आतापर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी १०२ प्राप्त झाले आहेत. ते सर्व निगेटीव्ह आले आहेत. तिसऱ्या कोरोना बाधित व्यक्तीचा अंतिम अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्याला घरी सोडले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

 दरम्यान, आज अखेरपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने १००२ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील २६ जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. यात बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे तर दुसरा बाधित रुग्ण हा मूळचा श्रीरामपूर तालुक्यातील असून तो पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

एकूण ८४८ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. अद्याप १२२ स्त्राव नमुना चाचणीचे अहवाल दिले होते. त्यापैकी १०३ अहवाल आज आले. ०७ स्त्राव अहवाल प्रयोगशाळेने नाकारले आहेत. जिल्हा रुग्णालयात १५३ जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एकूण ५६१ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. मुरंबीकर यांनी दिली.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So today Ahmednagar district would have been free of corona ...