त्यामुळे दोन टन  मासे पडले मृत्यूमुखी ः वाचा कुठे 

whilethefede.jpg
whilethefede.jpg
Updated on: 

आटपाडी (सांगली) ः विठलापूर येथील शेतकरी सुभाष सावंत यांच्या मत्स्यपालन केलेल्या शेततळ्यामध्ये अज्ञाताने विषारी औषध टाकल्याने तब्बल दोन ते अडीच टन मासे मृत्यू पावले आहेत. यासंदर्भात श्री सावंत यांनी अज्ञाताच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत माहिती अशी, आटपाडी तालुक्‍यातील विठलापूर येथील सुभाष सावंत यांची डाळिंबाची बाग आहे. बागेला दुष्काळी परिस्थितीत पाणी कमी पडू नये म्हणून त्यांनी शेततळे खोदले आहे. या शेततळ्यामध्ये त्यांनी एक लाखावर मत्स्यबीज सोडले होते.

याला दीड ते दोन महिने झाले आहेत. माशांच्या सुरक्षिततेसाठी शेततळ्यावर संपूर्ण जाळीचे अच्छादन ही केले आहे. पंरतु अज्ञाताने शेततळयामध्ये विषारी औषध टाकल्याने अंदाजे अडीच टन मासे मृत झाले आहेत. हे मेलेले मासे पाण्यावरती तरंगताना ही घटना त्यांना माहिती झाली.दोन लाख 50 हजाराचे नुकसान झाले आहे. याबाबत आटपाडी पोलिसात तक्रार देण्यात आली असल्याचे शेतकरी सुभाष सावंत यांच्याकडून सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam additional water demand for Sangli
Sangli District Bank Election Strategy
Woman Allegedly Extorted of ₹17 Lakh
Gopichand Padalkar sangli jilha bank
Marathi News Esakal
www.esakal.com