सांगलीत सोशल डिस्टन्सिंग सुरु 

 Social Distancing started in Sangli
Social Distancing started in Sangli
Updated on

सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपर्क कमी करा, तीन फूट लांब रहा, असे वारंवार आवाहन करुनही नागरिक शहाणे होत नाहीत, असे लक्षात आल्यानंतर प्रशासनच जागे झाले. आज शहरातील सर्व दुकानांसमोर प्रशासनाने तीन फुटांवर चौकोन आखून त्यातच थांबण्याची सक्ती केल्याने सोशल डिस्टन्सिंग सुरु झाले. त्यामुळे दुकानांसमोर अशा चौकोनातच नागरिक रांगेत उभे राहिल्याचे चित्र दिसत होते. 
कोरोनाचा विषाणू तीन फुटांपर्यंत लांब जात नाही, असे तज्ज्ञांनी सांगितल्यामुळे नागरिकांनी एकमेकांचा संपर्क तीन फुटांवरुन करावा, असे आवाहन करण्यात येत होते. एकतर गर्दी करु नका, जर आवश्‍यक असेल तर दोघांत किमान तीन फुटांचे अंतर ठेवा, असे वारंवार आवाहनही करण्यात येत आहे. तरीही गेले दोन तीन दिवस नागरिकांनी बाजारात, दुकानात गर्दी करताना या सूचनेची ऐशीतैशी केली. त्यामुळे प्रशासनाने बाजार, दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. 
आज सकाळी शहरात काही भागात दुकाने, दुध डेअरी, पेट्रोलपंप सुरु होते. तेथे गर्दी होती. पण, डेअरी, दुकानांसमोर तीन फुटांवर चौकोन आखून दिले जात होते. त्यातच गिऱ्हाईकांनी उभे रहावे, असे आवाहन दुकानदार करत होते. तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधून नागरिक तीन फुट अंतर ठेवून रांगेत उभे असल्याचे चित्र शहरातील दुकानांसमोर दिसत होते. हेच जर तीन चार दिवस आधी केले असते तर बरे झाले असते, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरु होती. त्यानंतर पोलिसांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. 

पेट्रोलपंपांसमोर गर्दी 
शहरात काही ठिकाणी पेट्रोलपंप सुरु होते. मात्र फक्त अत्यावश्‍यक सेवेसाठीच पेट्रोल दिले जात होते. पेट्रोलसाठी आलेल्या नागरिकांचे ओळखपत्र तपासून पेट्रोल देण्यात येत होते. त्यामुळे सामान्य नागरिकांनी वाद घालण्याचा प्रयत्न केल्यास थेट पंपासमोर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश लावलेला फलक दाखवला जात असे. त्या यादीत असाल तरच पेट्रोल मिळेल, असे स्पष्ट सांगण्यात येत होते. 

शहरात रस्ते सुनसान 
दुकाने, दुध डेअरी आणि पेट्रोलपंप वगळता शहरात इतरत्र मात्र गर्दी तुरळक होती. प्रमुख रस्ते ओसच होते. पेट्रोल मिळत नसल्याने अनावश्‍यक हुंदडणाऱ्यांची संख्याही कमी झाल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसही निवांतच होते. एखादेच वाहन तपासून सोडावे लागत होते. त्यांचाही ताण कमी झाल्याचे दिसत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com