Viral Reels : ऊसतोड पती-पत्नीच्या 'रिल्स'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ऊस तोड पतिपत्नी च्या रिल्स ला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिली आहे या रिल्सवर लाईक आणि कमेंट चा अक्षरश पाऊस पडत आहे.
Viral Reels
Viral Reelssakal

नवेखेड- सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ऊस तोड पतिपत्नी च्या रिल्स ला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिली आहे या रिल्सवर लाईक आणि कमेंट चा अक्षरश पाऊस पडत आहे.एक तेरे बिना दुनिया की हर चीज अधुरी लगती आहे

या हिंदी गाण्यावर हा व्हिडीओ बनविण्यात आला आहे सौ मनीषा व अनिल हजारे या जोडीचे नाव आहे केज जिल्हा बीड येथील हे दाम्पत्य असून त्यांच्या या व्हीडिओ ने महराष्टाला अक्षरशः वेड लावले आहे वास्तविक ऊस तोड मजू म्हणटल कीदुर्लक्षित घटक पोटाची खळगी भरण्यासाठी आपले गाव सोडून कोसो दूर आलेला प्रचंड काबाडकष्ट करणारा वर्ग पुरुषांबरोबर या महिला ही कामाला काटक ऊस तोड पूर्ण करून उसाने भरलेली बैल गाडी कारखान्याकडे घेऊन जातानाच हा व्हिडीओ आहे

सकाळी पहाटे ऊस तोडणीसाठी बाहेर पडलेले हे दाम्पत्य आहे पती बैलांना हाकत उसाच्या गाडीवर बसून जेवण करीत आहे तर मागे मोकळ्या वेळेत त्याच्या पत्नीने एक तेरे बिना

दुनिया की हर चीज अधुरी लगती है या हिंदी गाण्यावर चेहऱ्याची व देहबोलीची केलेली हाल हालचाल व पत्नीच्या या अदाकडे पाहून तिला पतीने दिलेली दाद हे अगदी अफलातून झाले आहे

सध्या अनेक प्रकारच्या रिल्स तयार होत आहेत परंतु सध्या तोडणी मजुरांच्या पत्नीने केलेली ही रील मात्र सोशल मीडियावर मोठा भाव खाऊन गेली आहे

हा व्हिडिओ अनेकांचा। स्टेटस बनला आहे लाखो व्हाटसपग्रुपवर तो शेअर झाला आहे.कष्टाचे जीवन जगतानाही मिळालेल्या वेळेत जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवला तर जगण्याचा चांगला आनंद घेता येतो हा संदेश या निमित्ताने सर्वदूर पोचला आहे.कसलेल्या कलाकारांना लाजवेल अशी या गाण्यातील त्यांची देह बोली आहे. या गाण्याच्या निमित्ताने पती पत्नीच्या नात्यातील दृढता आणखी गडद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com