कर्जमाफी तरीही सोसायट्यांकडून व्याज वसुली; सहकारकडून सरसकट चौकशी व्हावी 

societies still recover interest ; There should be a thorough inquiry
societies still recover interest ; There should be a thorough inquiry

सांगली : राज्य शासनाच्या श्री छत्रपती शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 71 हजार शेतकऱ्यांना 422 कोटी रुपयांची कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. राज्य शासनाने 30 सप्टेंबर 2019 अखेरची व्याज रक्कम संस्थांना दिलेली आहे. प्रत्यक्षात मार्चमध्ये रक्कमा संस्थांच्या खात्यावर वर्ग झाली.

या वाढीव पाच महिन्यांच्या कालावधीतील व्याज रक्कम जिल्ह्यातील विकास सेवा सोसायट्यांनी शेतकऱ्यांकडून भरुन घेतली आहे. नियमबाह्य वसुली केली आहे. पाच महिन्यांच्या व्याजावर सोसायट्यांनी बोट ठेवले आहे. याबाबत जिल्हा सहकार उपनिबंधकांकडे तक्रारींवर तातडीने निर्णय घेतले आहेत. मात्र अशा सर्वच खातेदारांची चौकशी व दोषींवर कारवाईची गरज आहे. 

राज्य शासनाने प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज वसूल करू नये असा आदेश होते. मात्र, तरीही सोसायट्यांनी कोणतेही लेखी आदेश नसताना शेतकऱ्यांकडून व्याजाची वसूल केली आहे. जिल्हा उपनिबंधक यांनी व्याज वसूल न करणेबाबत बॅंकांसह, सोसायट्यांना आदेश दिले होते. तरीही बहुतांश सोसायट्यांनी व्याज वसुली केली आहे. जिल्ह्यात विकास सेवा सोसायट्यांची संख्या 736 आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफीनंतर प्रत्यक्ष रक्कम मिळण्यास पाच-साडेपाच महिन्यांचा कालावधी लागला. सबंधित शेतकऱ्यांकडून नियम डावलून व्याज भरुन घेतली आहेत. त्यांची चौकशी करुन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे. 

तक्रारी येत नाहीत

जिल्ह्यातून केवळ तीन शेतकऱ्यांनी थेट माझ्याकडे तक्रार केल्या आहेत. सबंधितांचे व्याज घेवू नये असे आदेश दिले आहेत. याशिवायही व्याज वसुलीची चर्चा आहे. मात्र तक्रारी येत नाहीत. तरीही सर्व बॅंकां, सोसायट्यांना व्याज न घेण्याचे वारंवार आवाहन केले आहे.
- नीलकंठ करे, जिल्हा सहकार उपनिबंधक, सांगली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com