दुपारी म्हणाला सर्वकाही ठीक होईल अन्‌ रात्री झाला अपघातात मृत्यू..!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

प्रदीप जगन्नाथ गालपल्ली (वय ३३, रा. शांतीनगर झोपडपट्टी, सोलापूर) असे अपघातातील मृताचे नाव आहे. प्रदीप हा पुण्यात खासगी कंपनीत नोकरीला आहे. कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने तो सोलापुरात आला होता. सोमवारी रात्री विडी घरकुल परिसरातील नातेवाईकांकडे तो गेला होता.

सोलापूर : अपघातामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री बाराच्या सुमारास शांती चौकातील पाणी टाकीजवळ घडली. 
प्रदीप जगन्नाथ गालपल्ली (वय ३३, रा. शांतीनगर झोपडपट्टी, सोलापूर) असे अपघातातील मृताचे नाव आहे. प्रदीप हा पुण्यात खासगी कंपनीत नोकरीला आहे. कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने तो सोलापुरात आला होता. सोमवारी रात्री विडी घरकुल परिसरातील नातेवाईकांकडे तो गेला होता. नातेवाईकांच्या घरातून तो दुचाकीवरून शांती चौकमार्गे  घराकडे निघाला होता. शांती चौकात आल्यानंतर भरधाव ट्रकने प्रदीपच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन प्रदीपचा मृत्यू झाला. या प्रकरणात प्रदीपच्या दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, 'सर्व काही ठीक होईल. कदाचित आज नाही तर अखेरीस..' अशा प्रकारचा मेसेज प्रदीप याने आपल्या फेसबुकवर अपघाताच्या काही तास आधी शेअर केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur in accident death of Padeep Galpalli