
सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय दिव्यांग तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आला. तसेच ती गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, दुसरा संशयित दिशान शेख (वय २५, रा. सोलापूर) हा पसार झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी दिली.