esakal | सोलापूर शहर हाताबाहेर ! सोमवारी सर्वाधिक 126 रुग्णांची भर; सहाजणांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

3corona_805.jpg

ठळक बाबी... 

 • शहरातील 13 हजार 926 जणांची आतापर्यंत झाली कोरोना टेस्ट 
 • आतापर्यंत शहरातील बाधितांची संख्या दोन हजार 814; एक हजार 436 जणांची कोरोनावर मात 
 • शहरातील मृतांचा आकडा आता 277; सोमवारी सहा जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
 • संस्थात्मक विलगीकरण कक्षात एक हजार 130, तर होम क्‍वारंटाईनमध्ये एक हजार 177 व्यक्‍ती 
 • शहरातील विविध रुग्णालयात सुरु आहेत एक हजार 101 रुग्णांवर उपचार 
 • सोमवारी राहिले 193 अहवाल प्रलंबित; शहराची परिस्थिती गेली हाताबाहेर 

सोलापूर शहर हाताबाहेर ! सोमवारी सर्वाधिक 126 रुग्णांची भर; सहाजणांचा मृत्यू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत असून सोमवारी सर्वाधिक 126 रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत शहरातील 13 हजार 926 संशयित व्यक्‍तींची कोरोना टेस्ट झाली असून त्यामध्ये दोन हजार 814 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 277 झाली आहे. 

मृतांमध्ये शाहीर वस्ती येथील 56 वर्षीय पुरुष, जुळे सोलापुरातील कल्याण नगरातील 71 वर्षीय महिला, बाळे परिसरातील नंदिमठ नगरातील 65 वर्षीय महिला, रविवार पेठेतील लक्ष्मी अर्पाटमेंटमधील 78 वर्षीय पुरुषाचा तर हैदराबाद रोडवरील रंगराज नगरातील 67 वर्षीय पुरुषाचा आणि मुरारजी पेठेतील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. तर भुदेवी नगर, सिध्देश्‍वर नगर (मजरेवाडी), सुरवसे नगर, निसर्ग विहार, हत्तुरे नगर, सेव्हन अर्पाटमेंट (होटगी रोड), दोन नंबर झोपडपट्टी (विजापूर नाका), नंदिमठ नगर, संतोष नगर, अंबिका नगर (बाळे), भवानी पेठ, मिल्लत नगर, नवी पेठ, लक्ष्मी पेठ (दमाणी नगर), समर्थ नगर (जिल्हा न्यायालय), उत्तर कसबा, लक्ष्मी मंदिराजवळ (देगाव रोड), कुचन नगर, जुनी पोलिस लाईन, मुरारजी पेठ, यश नगर (मुरारजी पेठ), विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती (हत्तुरे वस्ती), सिध्देश्‍वर नगर (नई जिंदगी), उत्कर्ष नगर, प्रल्हाद नगर (विजयपूर रोड), जोडभावी पेठ, गोकूळ नगर, जय जलाराम नगर, रुबी नगर, रंजना सोसायटी, बॉम्बे पार्क, सिध्देश्‍वर नगर (जुळे सोलापूर), स्वामी विवेकानंद नगर (सैफूल), घोंगडे वस्ती, किर्लोस्कर कॉलनी, आयोध्या नगर (हैदराबा रोड), चौपाड, भाग्यश्री पार्क (मजरेवाडी), रंगरेज नगर, भिम नगर (सोरेगाव), सेटलमेंट कॉलनी, राघवेंद्र टॉवर (पाच्छा पेठ), निर्मिती सोसायटी (प्रताप नगर), महेश थोबडे नगर, भवानी पेठ, शिवगंगा नगर (शेळगी), गंगा नगर (देगाव नाका), अवंती नगर (पुना नाका), दक्षिण कसबा, दत्त नगर, गोंधळे वस्ती, बुधवार पेठ, पश्‍चिम मंगळवार पेठ, सागर गॅसजवळ, रेल्वे लाईन, न्यू पाच्छा पेठ, भूषण नगर, अश्‍विनी कॉलनी, कमला नगर याठिकाणी सोमवारी (ता. 6) नव्याने रुग्ण सापडले आहेत. 

ठळक बाबी... 

 • शहरातील 13 हजार 926 जणांची आतापर्यंत झाली कोरोना टेस्ट 
 • आतापर्यंत शहरातील बाधितांची संख्या दोन हजार 814; एक हजार 436 जणांची कोरोनावर मात 
 • शहरातील मृतांचा आकडा आता 277; सोमवारी सहा जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
 • संस्थात्मक विलगीकरण कक्षात एक हजार 130, तर होम क्‍वारंटाईनमध्ये एक हजार 177 व्यक्‍ती 
 • शहरातील विविध रुग्णालयात सुरु आहेत एक हजार 101 रुग्णांवर उपचार 
 • सोमवारी राहिले 193 अहवाल प्रलंबित; शहराची परिस्थिती गेली हाताबाहेर 
loading image