सोलापूर शहर पाच हजारांच्या उंबरठ्यावर! कडक लॉकडाउनमुळे घटतेय रुग्णसंख्या; आज 56 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे
Friday, 31 July 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील 34 हजार 65 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरातील चार हजार 985 व्यक्‍तींना कोरोनाची लागण 
  • एकूण रुग्णांपैकी 359 रुग्णांचा झाला मृत्यू; आज सापडले 56 पॉझिटिव्ह 
  • राजेश कोठे नगर, नेहरु नगर, कोंडा नगरातील तिघांचा झाला कोरोनामुळे मृत्यू 
  • आज 37 रुग्णांना सोडले घरी; तीन हजार 36 रुग्णांनी केली कोरोनावर मात 

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या हेतूने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त व महापालिका आयुक्‍तांनी दहा दिवसांचा कडक लॉकडाउन केला. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. शुक्रवारी (ता. 31) शहरात 976 पैकी 56 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दुसरीकडे तिघांचा मृत्यू झाला आहे. 

 

न्यू पाच्छा पेठ, पुनम नगर, डी-मार्टजवळ (जुळे सोलापूर), मंजुषा सोसायटी (विकास नगर), सिध्दीविनायक नगर, शिवसृष्टी बनशंकरी नगर, वर्धमान नगर, सन्मित्र नगर (शेळगी), राजेश कोठे नगर, राऊत वस्ती (मजरेवाडी) अवंती नगर (मुरारजी पेठ), कोंडा नगर (एसव्हीसीएस शाळेजवळ), आसरा चौक, हरिपदम सोसायटी, मार्कंडेय नगर (कुमठा नाका), कुमठा तांडा, मड्डी वस्ती (कुमठे), साई नगर, महालिंगेश्‍वर नगर (होटगी रोड), विद्या नगर (उत्तर सदर बझार), कुमठे, युनिक रेसिडेन्सी (अशोक चौक), रेल्वे लाईन्स, गणेश मंदिराजवळ (रामवाडी), वज्रेश्‍वरी नगर (अक्‍कलकोट रोड), सिध्देश्‍वर पेठ, शिवगंगा मंदिराजवळ (पश्‍चिम मंगळवार पेठ), कित्तूर चन्नम्मा नगर (सैफूल), यशनगर, गोकूळ नगर, पाटील नगर (विजयपूर रोड), राघवेंद्र प्लॅटिनम परिसर, तोडकर वस्ती (बाळे), गुलमोहर सोसायटी (वसंत विहार), राघवेंद्र नगर, हत्तुरे वस्ती, रेसिडेन्सी क्‍वार्टर (मार्कंडेय रुग्णालयाजवळ), जोडभावी पेठ, कस्तुरबा मार्केटजवळ या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील 34 हजार 65 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरातील चार हजार 985 व्यक्‍तींना कोरोनाची लागण 
  • एकूण रुग्णांपैकी 359 रुग्णांचा झाला मृत्यू; आज सापडले 56 पॉझिटिव्ह 
  • राजेश कोठे नगर, नेहरु नगर, कोंडा नगरातील तिघांचा झाला कोरोनामुळे मृत्यू 
  • आज 37 रुग्णांना सोडले घरी; तीन हजार 36 रुग्णांनी केली कोरोनावर मात 

संपर्कातील व्यक्‍तींचा घोळ मिटेना 
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील किमान आठ ते दहा व्यक्‍तींची संस्थात्मक विलगीकरण केंद्रात रवानगी करण्याचे महापालिका आयुक्‍तांनी यापूर्वीच स्पष्ट केले. त्यानुसार काही दिवस कार्यवाही झाली, मात्र दररोज शहरात सरासरी 50 हून अधिक रुग्णांची भर पडत आहे. तरीही संस्थात्मक व होम क्‍वारंटाईनमधील व्यक्‍तींमध्ये म्हणावी तशी वाढ झालेली दिसत नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील किती व्यक्‍तींना क्‍वारंटाईन केले जाते, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur city on the threshold of five thousand! Decreasing patient numbers due to severe lockdown; Today 56 positive