शहरात कोरोनाचा हाहाकार ! आज शहरात 145 पॉझिटिव्ह; 32 वर्षीय पुरुषासह चौघांचा मृत्यू 

तात्या लांडगे
Saturday, 18 July 2020

ठळक बाबी... 

  • शहरात शनिवारी (ता. 18) सापडले नवीन 145 कोरोनाबाधित रुग्ण 
  • लक्ष्मी बॅंक कॉलनी, तात्या पार्क, काडादी नगर आणि देवकर नगर (देगाव) येथील पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू 
  • शहरातील कोरोनाबाधितांची संख्या तीन हजार 702 तर मृतांची संख्या 322 झाली 
  • आतापर्यंत शहरातील 18 हजार 783 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरातील सुमारे दोन हजार व्यक्‍ती होम क्‍वारंटाईन; 824 व्यक्‍ती संस्थात्मक विलगीकरण केंद्रात 

सोलापूर : शहरात शनिवारी नव्या 145 रुग्णांची भर पडली असून आता एकूण रुग्णसंख्या तीन हजार 702 झाली आहे. तर आज 32 वर्षीय पुरुषासह चौघांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 322 झाली आहे. शहरातील एक हजार 83 व्यक्‍तींचे शनिवारी (ता. 18) अहवाल प्राप्त झाले. 

 

शहरात आता घरोघरी जाऊन ऍन्टीजेन टेस्टच्या अनुषंगाने सर्व्हे सुरु झाला असून त्यासाठी 15 टीम नियुक्‍त केल्या आहेत. संशयितांच्या आता दररोज एक हजार टेस्ट केल्या जात असून त्यांचा रिपोर्टही लवकर येऊ लागला आहे. मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सूचना करुनही महापालिकेने संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्‍तींमध्ये वाढ केलेली नाही. सद्यस्थितीत दोन हजार व्यक्‍ती होम क्‍वारंटाईन असून अवघे 824 संशयित संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल आहेत. शहरातील एकूण रुग्णांपैकी दोन हजार 75 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या एक हजार 305 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

ठळक बाबी... 

  • शहरात शनिवारी (ता. 18) सापडले नवीन 145 कोरोनाबाधित रुग्ण 
  • लक्ष्मी बॅंक कॉलनी, तात्या पार्क, काडादी नगर आणि देवकर नगर (देगाव) येथील पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू 
  • शहरातील कोरोनाबाधितांची संख्या तीन हजार 702 तर मृतांची संख्या 322 झाली 
  • आतापर्यंत शहरातील 18 हजार 783 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरातील सुमारे दोन हजार व्यक्‍ती होम क्‍वारंटाईन; 824 व्यक्‍ती संस्थात्मक विलगीकरण केंद्रात 

 

'या' ठिकाणी सापडले नवे रुग्ण 
भाग्यश्री पार्क, लोकमान्य नगर, श्रीशैल मल्लिकार्जुन नगर (होटगी रोड), ओम नमशिवाय नगर, लक्ष्मी नगर, स्वामी विवेकानंद नगर (हत्त्तुरे वस्ती), एसआरपी कॅम्प, न्यू पाच्छा पेठ, धर्मश्री लाईन (मुरारजी पेठ), डीआरएम ऑफिस, बंजारा नगर, प्रताप नगर, आदित्य नगर, कमला नगर, सैफूल, नरेंद्र नगर, सिंधू कॉलनी, इंदिरा नगर (विजयपूर रोड), कुमारस्वामी नगर (शेळगी), नळबझार (लष्कर), ईएसआय क्‍वार्टर, साधू वसावानी (गुरुनानक चौक), पंचशिल नगर (कुमठा नाका), खडक गल्ली, मारुती गल्ली, संतोष नगर, नंदीमठ नगर, राहूल नगर (बाळे), शिंगवी भवन (बुधवार पेठ), लक्ष्मी मार्केट (दक्षिण कसबा), भौरवी कॉलनी (दमाणी नगर), आदर्श नगर, शिवगंगा नगर, मल्लिकार्जुन नगर (कुमठा नाका), मोदीखाना, माशाळ वस्ती, भवानी पेठ, रेसिडेन्सी क्‍वार्टर (सिव्हिल), जाम मिल कपांउड, न्यू लक्ष्मी चाळ, गिता नगर, मुग्धा बंग्लोज, रचना सोसायटी, दावत हॉटेलजवळ (जुळे सोलापूर), वैष्णवी नगर, नवनाथ नगर, यशराज नगर, ईश्‍वर नगर (अक्‍कलकोट रोड), केगाव, टिळक नगर, शास्त्री नगर, राघवेंद्र नगर, अरविंद धाम (मुरारजी पेठ), टिळक चौक, शिवगंगा नगर, मड्डी वस्ती (कुमठे), माळी नगर (एमआयडीसी), मोटे वस्ती (बुधवार पेठ), शुक्रवार पेठ, न्यू बुधवार पेठ, निराळे वस्ती, सेटलमेंट फ्रि कॉलनी, अलंकापुरी नगर, संजय गांधी नगर, जुनी मिल चाळ, सिंधू विहार, ईदगाह मश्‍जिदीजवळ, बापूजी नगर, राघवेंद्र नगर (विडी घरकूल), अंत्रोळीकर नगर, थोबडे वस्ती, साठे-पाटील वस्ती, जयभवानी सोसायटी (कुमठा नाका), जोडभावी पेठ, देगाव, हुच्चेश्‍वर मठाजवळ, दमाणी नगर याठिकाणी शनिवारी नवे रुग्ण सापडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur city today in the 145 corona positives ; Four died including a 32 year old man