esakal | सोलापूर जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुखाची हकालपट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

-

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अदेशाने सोलापूर जिल्ह्यासाठी प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून पुरोषत्तम बरडे यांची निवड केल्याचे वृत्तही ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

सोलापूर जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुखाची हकालपट्टी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्हा जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी पक्षविरोधी कारवया केल्याचे कारण करत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त ‘समाना’मध्ये शनिवारी (ता. ११) प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे जिल्हा शिवसेनेमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. आता शिवसेनेच्या सहसंपर्कप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अदेशाने सोलापूर जिल्ह्यासाठी प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून पुरोषत्तम बरडे यांची निवड केल्याचे वृत्तही ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
विधानसभा निवडणूक झाल्यापासून जिल्ह्यातील शिवसेनेत नवनवी घडामोडी घडत आहेत. आमदार .तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने आधीच त्यांच्यातील काही कार्यकर्ते नाराज होते. याबाबत सामादुयिक राजीनामे देण्याच्याही तयारीत काही कार्यकर्ते होते. यासाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठकही बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकील काही प्रमुख कार्यकर्ते गैरहजर होते. त्यावरुन शिवसेनेत दोन गट पडल्याचे उघड झाले होते. त्यानंतर राजीनामा देण्यासाठी नाही तर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. विधानसेच्या निवडणुकीत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, शहर मध्य मतदारसंघात महेश कोठे यांना प्रा. सावंत यांच्यामुळे उमेदवारी मिळाली नसल्याचा आरोप केला जात होता. करमाळ्यातून राष्ट्रवादीतून प्रवेश केलेल्या रश्‍मी बागल व शहर मध्य मध्ये काँग्रेसमधून प्रवेश केलेल्या माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेला पराभव स्विकारावा लागला. तेव्हापासून शिवसेनेतील एका गटाच्या हिटलीस्टवर सावंत आहेत. ठोंगे पाटील यांच्या हकलपट्टीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. 

बर्डे यांची नियुक्ती
शहर मध्य मतदारसंघातून बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक रिंगणात उतरलेले महेश कोठे यांच्यामुळे जिल्हाप्रमुख पद रिक्त झाले होते. त्या जागेवर प्रभारी जिल्हा प्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांची नियुक्ती केल्याची चर्चा आहे. शिवसेनेतून दबाव आल्यास सोलापूरातील आणखी एकाचा बळी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दिलीप माने यांची हालचाल
दिलीप माने यांच्यावर संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेतील पदाधीकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत शनिवारी दुपारी १२ वाजता मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक होणार असदल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.