
सोलापूरः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मॉन्सूनचे जोरात आगमन झाल्याने अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. सलगच्या पावसाने जिल्ह्यात भीमा आणि नीरा खोऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली. पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पंढरपुरातील जुना दगडीपूल पाण्याखाली गेला असून, नदीपात्रातील सर्व मंदिरांना पाण्याने वेढा दिला. या पावसामुळे पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यांतील २१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पुरात अडकलेल्या जवळपास ३८४ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.