सोलापूरचा मृत्यूदर राज्यात अव्वलच! मंगळवारी 'या' नगरात सापडले 38 पॉझिटिव्ह; पाचजणांचा मृत्यू 

तात्या लांडगे
Tuesday, 7 July 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील पाच व्यक्‍तींचा आज (मंगळवारी) कोरोनामुळे मृत्यू; मृत्यूदर राज्यात अव्वल 
  • शहरात नव्या 38 रुग्णांची पडली भर; रुग्णसंख्या आता दोन हजार 852 झाली 
  • रुग्णांच्या थेट संपर्कातील 47 व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित; ंगळवारी 39 जणांची कोरोनावर मात 
  • शहरातील मृत्यूदर 10 टक्‍क्‍यांहून अधिक; मृतांची संख्या आटोक्‍यात येईना 
  • मंगळवारी (ता. 7) 30 वर्षीय महिलेसह 65 वर्षांवरील चौघांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 

सोलापूर : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी-अधिक होत असतानाही दुसरीकडे मात्र, मृतांची संख्या कमी झालेली नाही. मंगळवारी (ता. 7) शहरात 38 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तर दुसरीकडे पाचजणांचा कोरोनाने बळी घेतला असून त्यामध्ये जोडभावी पेठेतील 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता मृतांची संख्या 282 झाली असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार 852 झाली आहे. सोलापूर शहराचा मृत्यूदर बाधित रुग्णांच्या तुलनेत राज्यात अव्वलच आहे. 

म्हेत्रे वस्ती (प्रतापनगर) येथे तीन, स्वामी विवेकानंद नगरात दोन, कुमठे येथे तीन, रामदेव नगर (शेळगी) येथे तीन, शाहीर वस्ती (भवानी पेठ), हराळे नगर (मजेरवाडी), कल्याण नगर (होटगी रोड) आणि वसंत नगर याठिकाणी प्रत्येकी दोन रुग्णांची नव्याने भर पडली. तसेच सम्राट चौक, जम्मा वस्ती, जग्गम वस्ती (अक्‍कलकोट रोड), विजयपूर रोडवरील गरिबी हटाव झोपडपट्टी, विद्यानगर (शेळगी), गुरुवार पेठ, महेश थोबडे नगर, हैदराबाद रोडवरील कमल नगर, शिक्षक सोसायटी, अक्‍कलकोट रोड एमआयडीसी, साखर पेठ, विडी घरकूल, दक्षिण कसबा, संगम नगर (मुळेगाव रोड), राजीव गांधी नगर (भवानी पेठ), सिध्देश्‍वर नगर (नई जिदंगी), एसआरपीएफ क्‍वार्टर, हब्बू वस्ती, अशोक चौकातील सत्यम हॉटेलजवळ प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. 

पाचजणांचा झाला मृत्यू 
दाते गणपतीजवळील राजवाडा संकूल येथील 69 वर्षीय पुरुष, जोडभावी पेठेतील 30 वर्षीय महिला, पद्मानगरातील 65 वर्षीय महिला, जुळे सोलापुरातील गोकूळ नगरातील 78 वर्षीय पुरुषाचा तर महेश थोबडे नगरातील 84 वर्षीय पुरुषाचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील पाच व्यक्‍तींचा आज (मंगळवारी) कोरोनामुळे मृत्यू; मृत्यूदर राज्यात अव्वल 
  • शहरात नव्या 38 रुग्णांची पडली भर; रुग्णसंख्या आता दोन हजार 852 झाली 
  • रुग्णांच्या थेट संपर्कातील 47 व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित; ंगळवारी 39 जणांची कोरोनावर मात 
  • शहरातील मृत्यूदर 10 टक्‍क्‍यांहून अधिक; मृतांची संख्या आटोक्‍यात येईना 
  • मंगळवारी (ता. 7) 30 वर्षीय महिलेसह 65 वर्षांवरील चौघांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur has the highest mortality rate in the state Five people died on Tuesday