सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या यन्नम ; उपमहापौरपदी राजेश काळे

विजयकुमार सोनवणे 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसला पाठिंबा दिला. तरीही भाजपचे काळे विजयी झाले. काळे यांना ५०  तर पटेल  ३४ यांना मते मिळाली. एम आय एम च्या शेख यांना आठ मते मिळाली.

सोलापूर ः सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची तर उपमहापौरपदी राजेश काळे यांची बहुमताने निवड झाली.

भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांनी  एम आय एम च्या शहाजीदा बानो शेख यांचा पराभव केला. शिवसेनेच्या सारीका पिसे व कॉंग्रेसच्या फिरदोस पटेल यानी अनपेक्षित माघार घेतल्याने निवडणुकीस वेगळी कलाटणी मिळाली. यन्नम यांना 51 मते, तर शेख यांना 08 मते मिळाली. कॉंग्रेस व शिवसेना, वंचीतचे नगरसेवक तटस्थ राहिले.

उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसला पाठिंबा दिला. तरीही भाजपचे काळे विजयी झाले. काळे यांना ५०  तर पटेल  ३४ यांना मते मिळाली. एम आय एम च्या शेख यांना आठ मते मिळाली.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महापालिकेतील शिवसेना, कॅंाग्रेस, राष्ट्रवादी कॅंाग्रेससह एमआयएम एकत्रित आले होते. दरम्यानच्या कालावधीत बऱ्याच घडामोडी झाल्या आणि महाविकास आघाडीला ग्रहण लागले. निवडीची पूर्वसंध्येलाच महाविकास
आघाडीत फाटाफूट झाली. एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेऊन भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता मात्र एम आय एम ने आपला उमेदवार कायम ठेवला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्या अध्यक्षतेखाली महापौर व उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. मावळत्या महापौर शोभा बनशेट्टी, मावळत्या उपमहापौर शशीकला बत्तुल, पीठासीन अधिकारी श्री. वायचळ यांच्यासह
सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवकांनी नूतन महापौर यन्नम व उपमहापौर काळे  यांचे अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur mayor of Yannam; Rajesh Kale as Deputy Mayor