सोलापूर- मिरज एक्सप्रेस कराडपर्यंत धावणार

संतोष भिसे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मिरज - कराड, सातारा व सांगलीतील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. कराड ते सांगली व कराड ते पंढरपूर दरम्यानचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कराड ते मिरजदरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. सोलापूर ते मिरज एक्सप्रेस कराडपर्यंत वाढवली आहे. उद्यापासून काही दिवसांसाठी ती सोलापूर- कराड एक्सप्रेस म्हणून धावेल. 

कराड ते पंढरपूर विशेष रेल्वेगाडी दहा दिवसांसाठी सुरु करावी, अशी विनंती सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपने पुणे विभागीय व्यवस्थापकांना केली होती. ती मान्य करण्यात आली. 
व्यवस्थापक मिलींद देऊसकर यांनी सोलापुर ते मिरज एक्स्प्रेस एका आठवड्यासाठी कराड पर्यंत विस्तारित करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासूनच एक आठवड्यासाठी ती धावू लागेल. तिला कराड, शेणोली, ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडी, नांद्रे, सांगली, विश्रामबाग व मिरज असे थांबे देण्यात आले आहेत. सांगली व सातारा जिल्ह्यांतील सर्व प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur - Miraj Express will run upto Karad