स्मार्ट कमांड ऍन्ड कंट्रोल बिल्डिंगची उभारणी

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 30 मे 2018

होम मैदानासाठी चार निविदा 
होम मैदान विकसित करण्यासाठी चार निविदा दाखल झाल्या आहेत. त्या उद्या (बुधवारी) उघडल्या जाणार आहेत. एलईडीचे कामही कोणाला मिळाले हेही याचवेळी स्पष्ट होणार असल्याची माहिती देण्यात आली. 

सोलापूर : महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सेवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी "स्मार्ट कमांड ऍन्ड कंट्रोल बिल्डिंग'ची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी भोपाळ किंवा अहमदाबाद स्मार्ट सिटीने उभारलेल्या यंत्रणेची पाहणी केली जाणार आहे. 

महापालिकेच्या मागील मोकळ्या जागेत किंवा अन्यत्र इतर ठिकाणी उपयुक्त अशी चार मजली इमारत उभारली जाणार आहे. हे सेंटर उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. हे सेंटर सुरु झाल्यावर शहरात उद्‌भवणाऱ्या विविध अडचणींची एका ठिकाणी माहिती होणार आहे. पथदिवा बंद पडला, नळाला गळती झाली, कचरा साचला या आणि इतर समस्यांचीही माहिती लगेच या सेंटरला दिसणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारली जाणार आहे. 

या सेंटरच्या अंतर्गत सर्व्हेलन्स नेटवर्क, स्काडा प्रणाली, एलईडी स्ट्रीट लाईट, घनकचरा व्यवस्थापन, ऑनलाईन तक्रार निवारण केंद्र, व्हेरीअेबल मेसेज सिस्टिम, ई-टॉयलेट, ड्रेनेज डिस्चार्ज इंटिग्रेशन, हवा गुणवत्ता व ध्वनी प्रदूषण सेन्सर, बायोमेट्रीक प्रणाली, तलावातील पाणी चांगले राहण्यासाठीचे सेन्सर आदी नियंत्रण ठेवले जाणार आहे. शहरात कोणत्याही ठिकाणी काही घडले की त्याची माहिती त्वरीत या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार तातडीने उपाय योजना केल्या जाणार आहेत. 

होम मैदानासाठी चार निविदा 
होम मैदान विकसित करण्यासाठी चार निविदा दाखल झाल्या आहेत. त्या उद्या (बुधवारी) उघडल्या जाणार आहेत. एलईडीचे कामही कोणाला मिळाले हेही याचवेळी स्पष्ट होणार असल्याची माहिती देण्यात आली. 

Web Title: Solapur Municipal Corporation home