सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत तीन दिवसांत 68.99 कोटी 

विजयकुमार सोनवणे 
गुरुवार, 29 मार्च 2018

शहराच्या हद्दवाढ विभागाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या योजनेंतर्गत 17 कोटी 40 लाख 60 हजार 189 रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी शासनाचा 80 टक्के हिस्सा म्हणून 13 कोटी 92 लाख रुपये मिळणार असून, 20 टक्के हिस्सा म्हणून तीन कोटी 48 लाख रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत. बुधवारी मंजूर झालेल्या 10 कोटी अनुदानासाठी पालिकेस हिस्सा भरावा लागणार नाही. मात्र, ही रक्कम ज्या कामांसाठी मंजूर झाली आहे, तीच कामे अनुदानातून करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

सोलापूर : केंद्र व राज्य शासनाच्या विशेष योजनेंतर्गत महापालिकेस मिळणाऱ्या अनुदानात आणखी 10 कोटी रुपयांची भर पडली. महापालिका क्षेत्रात करावयाच्या सुविधांसाठी राज्य शासनाने 14 महापालिकांना 367 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामध्ये सोलापूर महापालिकेस 10 कोटी रुपये मिळणार आहेत. 

गेल्या तीन दिवसात महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ६८.९९ कोटींची भर पडली आहे.
वित्त आयोगाच्या अनुदानानुसार सर्वाधिक 41 कोटी रुपये मिळणार आहेत. राज्यातील 372 संस्थांना 952 कोटी 91 लाख 50 हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे. लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या निकषानुसार हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व "ड' वर्ग महापालिकांचा समावेश आहे. 

शहराच्या हद्दवाढ विभागाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या योजनेंतर्गत 17 कोटी 40 लाख 60 हजार 189 रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी शासनाचा 80 टक्के हिस्सा म्हणून 13 कोटी 92 लाख रुपये मिळणार असून, 20 टक्के हिस्सा म्हणून तीन कोटी 48 लाख रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत. बुधवारी मंजूर झालेल्या 10 कोटी अनुदानासाठी पालिकेस हिस्सा भरावा लागणार नाही. मात्र, ही रक्कम ज्या कामांसाठी मंजूर झाली आहे, तीच कामे अनुदानातून करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

त्यामुळे हा निधी महापालिकेस इतर ठिकाणी वळवता येणार नाही. या योजनेंतर्गत होणारी सर्व कामे ई-निविदा पद्धतीनेच होणे बंधनकारक आहे. या सूचनेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास ती गंभीर अनियमितता समजली जाणार असून, त्यास जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. या निधीतून इतर कामे होत नाहीत ना याची खात्री करण्याची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. योजनेंतर्गत होणारी कामे ही सार्वजनिक मालकीच्या जागेतच होतील, याचीही दक्षता घेतली जाणार आहे. 

महापालिकेस मिळालेले अनुदान 
26 मार्च ः 14 वा वित्त आयोग ः 41.59 कोटी 
27 मार्च ः हद्दवाढीसाठी सुविधा ः 17.40 कोटी 
28 मार्च ः महापालिका क्षेत्रासाठी ः 10.00 कोटी 
एकूण ः 68.99 कोटी

Web Title: Solapur Municipal Corporation income