माचणुरचा मुघलकालीन किल्ला; हेमाडपंथी सिद्धेश्वर मंदिर

दावल इनामदार
रविवार, 30 जुलै 2017

नदीच्या पात्रात सुंदर देखने जटाशंकर मंदिर आहे.तरी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस ह.भ.प.बाबा महाराज आर्विकर यांचा मठ आहे.मठाच्या लगतच औरंगजेब बादशाहाचा किल्ला आहे.बादशहाने ११ रुद्राभिषेक श्रावण महिन्यामधे सुरु केले.

ब्रह्मपुरी : माचणुर(ता. मंगळवेढा)येथे भीमा नदीकाठावर कडेकपारीत प्राचीनकाली हेमाडपंती भव्य असे देखने श्री सिद्धेश्वराचे मंदिर असून, श्रावण मासानिमित्त येथे महिनाभर भाविकांची रेलचेल सुरु असते.                                                  

सोलापुरपासून ४०किलोमीटर व मंगळवेढ़यापासून १४ किलोमीटर अंतरावर माचणुर तीर्थक्षेत्र आहे.लाखों भक्ताचे श्रद्धास्थान असलेेल्या या मंदिरास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आदी भागातुन भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. बहु वैभवकुंड पंढरपुर येथील विट्ठलाच्या पदस्पर्शाने पावन होवुन माचणुर दिशेला प्रवाहीत होणारी भीमा नदी वाहत आहे. या नदीला येथे चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. चंद्रभागा नदीच्या मध्यावर भूगर्भ रेषेवर माचणुर हे गांव आहे. याच गावाला नाथाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. येथे प्राचीनकाली ऋषिमुनी तपस्येला बसत असत.अहिल्याबाई होळकर यानी नदी कडेच्या बाजुला भव्य असा घाट बांधला आहे.

नदीच्या पात्रात सुंदर देखने जटाशंकर मंदिर आहे.तरी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस ह.भ.प.बाबा महाराज आर्विकर यांचा मठ आहे.मठाच्या लगतच औरंगजेब बादशाहाचा किल्ला आहे.बादशहाने ११ रुद्राभिषेक श्रावण महिन्यामधे सुरु केले. श्रावण महिन्यामधे संपूर्ण महिनाभर ब्राम्हणाचे अधिष्ठान असते.या महिन्यामधे पूजा -अर्च्यासाठी औरंगजेब कालावधीन अर्थसहाय्य मिळत आहे.बादशहाने चार वर्षे या छावणीत राहुन दिल्लीचा कारभार पाहिला.या स्थळी शंकराचार्य ,स्वामी समर्थ,सीताराम महाराज,बाबा महाराज आर्विकर आदी संत येथे येऊन गेले आहेत. सिद्धेश्वर मंदिराच्या पूजेसाठी नगारा वाजवण्याचा मान माचणुर येथील मुस्लिम समाजाकड़े आहे.येथील सिद्धेश्वराची पूजा अर्चा करण्याचा मान ब्रह्मपुरीतील गुरव समाजाकडे असून प्रत्येक बुधवारी आठवडा पाळी प्रमाणे बदलला जातो.

*माचणूरचा किल्ला : 
किल्ल्याचा प्रकार : भुईकोट 
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर 
श्रेणी : सोपी

सोलापूर - मंगळवेढा रस्त्यावर सोलापूर पासून ४० किमी अंतरावर व मंगळवेढा पासुन १४ किमीवर माचणूर गाव आहे. या गावातून वहात जाणार्‍या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. या मंदिराजवळच माचणूरचा किल्ला आहे.
 *माचणूरचा किल्ला 
इतिहास :
दक्षिण जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्य़ांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता. त्यांच्या पासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हपुरी गावाजवळ भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५ च्या आसपास किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. औरंगजेब या किल्ल्यात बसून न्यायदान करीत असे.

या किल्ल्याच नाव माचणूर कसे पडले याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर सैनिकांना सिध्देश्वराची पिंड (शिवलींग) फोडण्याची आज्ञा केली. त्याकामासाठी गेलेल्या सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. याप्रकारने संतापलेल्या औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले, पण शंकराच्या पिंडीच्या पुढ्यात नैवेद्याचे ताट ठेवून त्यावरील कापड बाजूला केल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली.(त्यामुळे या ठिकाणाला मास - नूर असे म्हटले जाऊ लागले.पुढे याचाच अपभ्रंश होऊन गावाचे नाव माचणूर झाले.) या सर्व प्रकारामुळे औरंगजेब कालावधीण सिध्देश्वर मंदिरास अर्थसहय्य मिळत आहे.

पहाण्याची ठिकाणे :
माचणूर गडाच्या प्रवेशव्दारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या प्रवेशव्दारा समोर भिंत व दोन बुरुज उभारून आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे प्रवेशव्दार तटबंदी व बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून गडात प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या विरुध्द टोकाला मशिद आहे. मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशिदीच्या मागिल बाजूस खोलवर भीमा नदीचे पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पूरांमुळे नष्ट झालेली आहे. 

*सिध्देश्वर मंदिर :- माचंणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दातून प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. पुढे प्रशस्त पायर्‍या उतरून दुसर्‍या प्रवेशव्दारापाशी पोहोचता येते. या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवर्‍या काढलेल्या आहेत. मंदिरात ३ फूटी नंदी आहे. शिवलिंगा पर्यंत जाण्यासाठी २ दार आहेत. त्यातील पहील दार ५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे.या खिडकी वजा दरवाजातून बसुनच गाभार्‍यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मागिल बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे.भव्य असे नदी पात्रामधे जटाशंकराचे मंदिर आहे.

पोहोचण्याच्या वाटा :
माचणूर गाव सोलापूर -मंगलवेढा महामार्गावर   सोलापूर पासून ४० किमी व पंढरपूरपासून २६ किमी अंतरावर आहे. तर मंगळवेढ्या पासून १४ किमी अंतरावर आहे. गावात जाणार्‍या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते व रस्ता संपतो तेथे माचणूरचा किल्ला आहे.
राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही.

Web Title: Solapur news Brahmapuri siddheshwar temple