एकाच क्‍लिकवर आता "गुड मॉर्निंग' वर्ल्ड!

अलताफ कडकाले
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

"रेडिओ गार्डन'च्या माध्यमातून जगभरातले रेडिओ ऐकण्याची संधी
सोलापूर - गुड मॉर्निंगऽऽऽ वर्ल्ड... असे शब्द कानांवर पडले तर थोडंसं अचंबितच वाटेल ना! परंतु, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) इंटरनेट प्रेक्षकांसाठी एकाच क्‍लिकवर "रेडिओ गार्डन' च्या माध्यमातून जगभरातील रेडिओ ऐकण्याची पर्वणी उपलब्ध करून दिली आहे.

"रेडिओ गार्डन'च्या माध्यमातून जगभरातले रेडिओ ऐकण्याची संधी
सोलापूर - गुड मॉर्निंगऽऽऽ वर्ल्ड... असे शब्द कानांवर पडले तर थोडंसं अचंबितच वाटेल ना! परंतु, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) इंटरनेट प्रेक्षकांसाठी एकाच क्‍लिकवर "रेडिओ गार्डन' च्या माध्यमातून जगभरातील रेडिओ ऐकण्याची पर्वणी उपलब्ध करून दिली आहे.

त्यामुळे गुड मॉर्निंगऽऽऽ... वर्ल्ड, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
"इस्रो'ने भारतीयांसह जगभरातील इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी जगातल्या कोणत्याही देशाचे रेडिओ स्टेशन ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. इस्रोच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा आहे. "इस्रो अभिमानाने' हा संदेश सुमारे दोन आठवड्यांपासून व्हॉट्‌सऍपवर फेरफटका मारत आहे. संदेश म्हणतो, की आपण संदेशाच्या तळाशी असलेल्या लिंकवर क्‍लिक केल्यास, आपण जगातल्या कोणत्याही देशाचे रेडिओ ऐकू शकता. हे खरं आहे, की आपण "रेडिओ गार्डन'च्या माध्यमातून विविध देशांतून कित्येक रेडिओ स्टेशन ऐकू शकतो.

रेडिओ गार्डची स्थापना
नेदरलॅंड्‌सचे जोनाथन पकी यांनी रेडिओ गार्डनची स्थापना केली. हे ऑडिओ स्ट्रीमिंग तंत्रज्ञानावर काम करणारे एक व्यासपीठ असून, रेडिओ प्रसारणाला परवानगी देते. इंटरनेट प्रेक्षकांसाठी ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. जगभरातील रेडिओ स्टेशन यावर उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मवर प्रसारण प्रारंभ करण्यासाठी रेडिओ स्टेशनला या सेवेसह नोंदणी करणे आवश्‍यक आहे. एकदा नोंद केलेले रेडिओ स्टेशन ग्लोबवर पॉपअप होते. जे फक्त टेम्पलेट आहे आणि ते स्थान अधिक प्रभावीपणे दर्शविण्यासाठी हिरवे ठिपके वापरले जातात. हे ठिपके साइड वापरणाऱ्याला सहजपणे मदत करतात. क्‍लिक करा आणि आपल्या पसंतीचे रेडिओ स्टेशन निवडा.

रेडिओ लिंक
"रेडियन्स गार्डन' साठी दिलेली http:p://radio.garden/live अशी लिंक ओपन केली, तर गुगल क्रोमवर पृथ्वीचा गोल दिसतो. यावर हिरव्या रंगाचे अनेक ठिपके दिसतात. या ठिपक्‍यांना स्पर्श (टच) केल्यानंतर जगभरातील रेडिओ स्टेशन दिसतात. त्यातील एका ठिपक्‍यावर टच केल्यानंतर जो कोणत्या देशाचा रेडिओ असेल, तो लाइव्ह सुरू होईल.

Web Title: solapur news good morning world on one click