विठ्ठल-रुक्‍मिणी दर्शनाचे व्हीआयपी पास बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

सोलापूर - आषाढी एकादशीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनाला येतात. भाविकांना केंद्रबिंदू मानून यंदाच्या आषाढी यात्रेची तयारी करण्यात आली असून, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने यंदापासून व्हीआयपी पास देण्याचे बंद करण्यात आले आहे. परंपरेनुसार ज्यांना पूजेसाठी आहे त्या व्यक्तींनाच निमंत्रित केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी "सकाळ'ला दिली. 

डॉ. भोसले म्हणाले,""24 जून ते 9 जुलै या कालावधीत 24 तास दर्शन सुरू ठेवण्यात आले आहे. 28 जूनपासून ऑनलाइन दर्शन बंद करण्यात येणार आहे. या वर्षी राज्यभरात चांगला पाऊस झाल्याने आषाढी यात्रेला यंदा अधिक भाविक येण्याची शक्‍यता गृहीत धरून नियोजन केले आहे. आषाढीसाठी आठ मानाच्या दिंड्या येतात. यंदापासून नगर येथून निळोबा महाराजांची नव्याने दिंडी येत आहे.'' 

मंदिर समितीच्या वतीने वारकऱ्यांसाठी आठ ठिकाणी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पाणी वाटपासाठी 150 स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. समितीच्या वतीने राजगिराचे एक लाख तर बेसनाचे 70 हजार लाडू तयार करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत जड वाहनांची वाहतूक होऊ नये यासाठी नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या नियोजनासाठी पालखी मार्ग व पंढरपूर येथील 18 ठिकाणे निश्‍चित केली आहेत. 

Web Title: solapur news vip pass pandharpur