सोलापूर विद्यापीठ नामविस्तारासाठी 523 निवेदने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर असे नाव द्यावे, अशी मागणी शासनदरबारी प्रलंबित आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने संस्था, संघटना, व्यक्‍ती व राजकीय पक्षांकडून निवेदने मागविली आहेत. 26 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत होती. आतापर्यंत नामविस्ताराबाबत 523 निवेदने प्राप्त झाल्याची माहिती विद्यापीठाचे विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही. बी. पाटील यांनी दिली. प्राप्त निवेदने शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर मंत्र्यांच्या उपसिमितीकडून त्यावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जानेवारी महिन्यात ही सुनावणी विद्यापीठातच होईल, अशी शक्‍यता विद्यापीठाकडून व्यक्‍त करण्यात आली आहे. प्राप्त निवेदनात आमदार नारायण पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे 70 ग्रामपंचायती, मोहोळ पंचायत समितीसह विविध संघटना व समाजातील व्यक्‍तींची निवेदने असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Web Title: Solapur University Name Development Proposal