Solapur News : आफ्रिकेत तब्बल १ लाख अन् कश्मीरमध्ये ५ हजार शस्त्रक्रिया

गरजू रुग्णांसाठी झिजले त्यांचे हात; सोलापुरातील डॉ. राजीव प्रधान यांची कौतुकास्पद कामगिरी
1 lakh in africa and 5 thousand in jammu kashmir surgery done by dr rajeev pradhan
1 lakh in africa and 5 thousand in jammu kashmir surgery done by dr rajeev pradhan Sakal
Updated on

Solapur News : स्वतः च्या सुस्थापित व्यवयासायात कार्य करत असताना पॅथॉलॉजीस्ट डॉ. राजीव प्रधान यांनी रोटरीच्या माध्यमातून काम करताना एक स्वप्न पाहिले. आफ्रीकेसारख्या खंडात तब्बल तब्बल ३२ वेळा त्यांनी आफ्रिकेत सहकारी डॉक्टरांसमवेत १ लाखापेक्षा अधिक शस्त्रक्रिया घडवून आणल्या.

त्यानंतर जम्मू कश्मिरमध्ये देखील त्यांनी डॉक्टर चमूंच्या मदतीने ५ हजार शस्त्रक्रीया केल्या. आंतरराष्ट्रीय मानवतवादी डॉ. द्वारकानाथ कोटणीसाचा वारसा सिद्ध करण्याचे काम त्यांनी केले. त्यांची भारताचा बहुमान उंचावणारी कामगिरी भारतीय वैद्यक क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरली आहे.

डॉ. राजीव प्रधान हे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात पॅथॉलॉजीस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आई-वडिलांच्या समाजसेवेचे संस्कार त्यांना खुणावत होते. त्यांच्याकडे रोटरी क्लबचे गव्हर्नर पद असताना अमेरिकेचे एक वैद्यकीय पथक भारतात सेवा देण्यासाठी आले. डॉ. प्रधान यांना या पथकाने आपण अन्य देशात गरजूंना सेवा द्यावी असे सुचवले.

तेव्हा डॉ. राजीव प्रधान यांनी रोटरीच्या माध्यमातून देशातील अनेक डॉक्टरांशी संवाद साधून मोहिमेची आखणी केली. आफ्रिकेत आरोग्य सेवांची असलेली प्रचंड गरज पाहता ही मोहीम अत्यंत प्रभावी ठरली.

औषधी पुरवठा, शस्त्रक्रिया साहित्य, दुतावासांच्या परवानग्या या सारख्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत ही मोहीम दरवर्षी होऊ लागली. एकूण ३२ वेळा या मोहिमा करण्यात आल्या. त्यांच्या चमुने १ लाखापेक्षा अधिक शस्त्रक्रिया करून या रुग्णांना जीवनदान दिले. केंद्र सरकारने त्यासाठी सहकार्य केले.

अनेक वेळा औषधांचा खर्च डॉक्टरांनी उचलला. आफ्रिका खंडातील एकूण १६ देशात हे कार्य सुरू आहे. या आरोग्य सेवेचे ढोबळ आर्थिक मूल्याकंन २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ठरले. भारताकडून आफ्रीकन देशांना ही एक मोठी आंतरराष्ट्रीय मदतच ठरली. या अनुभवांवर आधारित त्यांनी एक अनामिक नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले.

डॉ. राजीव प्रधान हे एवढ्यावरच थांबले नाही तर जम्मू व कश्मिरमध्ये अशांततेच्या वातावरणातील रुग्णांसाठी त्यांनी मोहीम सुरू केली. दुर्गम भाग, शून्य अंशाखाली गेलेले तापमान, अपुऱ्या आरोग्य सुविधा व शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत असलेले रुग्ण या पार्श्वभूमीवर नवीन मोहीम सुरू झाली.

या मोहिमेत देशातील २६ तज्ज्ञ सहभाग घेत आहेत. त्यामध्ये डॉ. राजीव प्रधानांसोबत डॉ. गिरीश गुणे (पनवेल) यांचा उल्लेख करावा लागेल. सुरवातीला जम्मू भागात मोहीम राबवली गेली. त्यानंतर स्थानिक डॉक्टर मंडळींनी त्यात सहभाग घेतला.

आतापर्यंत झालेल्या ४ मोहिमांमध्ये ५ हजार ६०० शस्त्रक्रिया झाल्या. या मोहिमा उत्तर कश्मिर, दक्षिण कश्मीर व जम्मू भागात झाल्या. मागील आठवड्यात कश्मिर भागातील पाचवी मोहीम पूर्ण झाली. ही मोहीम राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणारी व आपल्या देशबांधवांच्यासाठी विशेष सेवा देणारी ठरली.

ठळक बाबी

  • आफ्रिकन खंडात १६ देशांत शस्त्रक्रिया मोहीम

  • आफ्रिकेत एकूण ३२ मोहिमा

  • करोडो रुपयांच्या औषधांची मदत

  • भारताची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय आरोग्य मदत

  • जम्मू काश्मिरमध्ये ५ हजार ६०० शस्त्रक्रिया

  • देशातील अनेक नामवंत डॉक्टरांचा सहभाग

  • शून्य अंशाखाली, दहशतवादाला न घाबरता राबवली मोहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com