
सोलापूर : १९९२ मध्ये हद्दवाढ होऊन ३३ वर्षे झाली, तरीदेखील हद्दवाढ भागातील सुमारे ५० नगरांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनच टाकलेली नाही. जलवाहिनी नसल्याने त्या नगरातील अंदाजे एक लाख नागरिकांना तहान भागविण्यासाठी पाण्यासाठी १२ महिने भटकंती करावी लागत आहे.