जिल्ह्यात 122  अंगणवाडीच्या बांधकामासाठी 10 कोटी 37 लाख रुपयांचा निधी

dilip chavan zp.jpg
dilip chavan zp.jpg
Updated on: 

मंगळवेढा (सोलापूर) : जिल्ह्यातील 122  अंगणवाडीच्या नवीन इमारत बांधकामासाठी 10 कोटी 37 लाख रुपयांच्या निधीस मंजूरी मिळाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भारत लहान मुलांसाठी असलेल्या अंगणवाडी ला इमारत नसल्याने त्यांना उघड्यावर तर काही ठिकाणी पर्यायी जागेत शिक्षण घ्यावी लागत असल्यामुळे त्यांची गैरसोय होत होती.शिवाय अंतर्गत सजावट देखील होत नव्हती. त्यांना स्वतःची जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने लक्ष घालून 10 कोटी 37 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना आता स्वतःचा निवारा उपलब्ध होणार आहे त्यामध्ये प्रत्येक अंगणवाडी ला 8.5 लाख रुपयाचा निधी इमारत बांधकामासाठी उपलब्ध केली जाणार आहे. तालुक्यासह गावनिहाय अंगणवाडी संख्या कंसात निधी लाखात अक्कलकोट 22(187),बार्शी 7(59.50),वैराग 12(102),करमाळा 5(42.50) माढा कुर्डूवाडी 1(8.5),टेभूर्णी 4(34),माळशिरस 2(17),अकलूज 3(25.5) मंगळवेढा 12(102), मोहोळ 19(161.5), उत्तर सोलापूर 4(34) पंढरपूर 10 (85),सांगोला 2(17), कोळा 2(17),द.सोलापूर 17(144.5) याप्रमाणे निधी मंजूर झाला असून मंगळवेढा तालुक्यामध्ये भोसे, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, ढवळस ,लेंडवेचिंचाळे,चोखोमेळा नगर,जालीहाळ,मानेवाडी,मुढवी, दामाजी नगर या ठिकाणातील 12 अंगणवाड्याला 1 कोटी 2 लाखाचा निधी मिळणार आहे तालुक्यामध्ये या गावातील अंगणवाडीला निधी उपलब्ध करावा अशी मागणी या भागातील नागरीका बरोबर दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे जिल्हा बँकेचे संचालक बबनराव आवताडे पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ जिल्हा परिषद सदस्य शीला शिवशरण मंजुळा कोळेकर प्रदीप खांडेकर यांनी ही मागणी केली होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com