उत्तर सोलापूर (वडाळा) - राज्यामध्ये ग्रामीण गृहनिमाण अंतर्गत 100 दिवसीय महाआवास अभियान दिनांक 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व देवेद्र फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थितीत महा आवास अभियान सन 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील राज्यातील 20 लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजूरी पत्र देण्यात येणार आहे.
या माध्यमातून ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी गतीमान, दर्जेदार अंमलबाजावणी व लोकसहभागासाठी प्रभावीपणे महाआवास अभियान राबविण्यात येणार आहे
यासाठी 22 फेब्रुवारी नव्याने मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्याना मंजुरीचे पत्र 2025 रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 वितरण कार्यक्रमा अंतर्गत पहिला हप्ता मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी 100 दिवसीय कार्यक्रामाची घोषणा केली असुन यामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनांसाठी ही 100 दिवसीय कार्यक्रम आखला आहे.
10 लक्ष घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाच्या कार्यक्रम दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 04.45 वा. मुख्य बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी, पुणे या ठिकाणी आयोजित केला आहे. सदर कार्यक्रमाचे ग्रामपंचायत, तालुका व जिल्हास्तरावरुन थेट प्रक्षेपण व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे होणार आहे. त्याची पुर्व नियोजन केलेले आहे.
ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्याच्या मंजुरी पत्र वितरण व हप्ता वितरण कार्यक्रमादिवशी ग्रामसभेचे आयोजन करण्यात करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये सर्व लाभार्थी परिवारासाह व ग्रामस्थ उपस्थितीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच तालुकास्तरावर आमदार यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर तालुक्यासाठी 2050 एवढे उदिदष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. गावनिहाय वितरीत करण्यात आलेले आहे व एकुण 1976 घरकुलाना मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी 1049 घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. अशी माहिती उत्तर सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
घरकुल योजनेसाठी प्रभावी शंभर दिवसांची आखणी
शंभर दिवसांच्या नियोजना अंतर्गत 13 लाख घरकुलांना मंजुरी दिली जाणार आहे.किमान 3 लाख मंजुर घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणुन एकुण रु 450 कोटी वितरीत करण्यात येणार आहे. तसेच किमान 1 लाख मंजुर घरकुले भौतिकदृष्टया पुर्ण करणे. किमान 5000 लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
या माध्यमातून ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी गतीमान, दर्जेदार अंमलबाजावणी व लोकसहभागासाठी महा आवास अभियान राबविणे हे उपक्रम निश्चित करण्यात आले आहे. अशी माहिती उत्तर सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.