

दयानंद कुंभार
वडाळा : वडाळा (ता. उत्तर सोलापूर )येथे आज उत्तर तालुक्यातील मतदारसंघातील 24 गावांच्या वतीने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बळीराम काका साठे यांनी मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमादरम्यान काही कार्यकर्त्यांनी तालुका पोलीस ठाणे व तहसील कार्यालय येथे मोठी नागरिकांची ससेहोलपट होत असल्याची भावना व्यक्त केली.