esakal | देवेंद्र फडणवीस यांच्या प्रा. सावंत यांना मोबाईलवरुन शुभेच्छा
sakal

बोलून बातमी शोधा

Political

विवाहसोहळ्यासाठी खास आकर्षण 
सेलिब्रेटी म्हणून छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील येसूबाई अर्थात प्राजक्ता गायकवाड, सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव, सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे व मालिकेतील भय्यासाहेब अर्थात किरण गायकवाड उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रा. सावंत यांना मोबाईलवरुन शुभेच्छा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : मुंबईत भाजपचे राष्ट्रीय शिबिर सुरू असल्याने सोनारी (जि. उस्मानाबाद) येथे भैरवनाथ कारखाना येथे जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजिलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास अनुपस्थित असल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववधूवरांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यात दोन मुस्लिम जोडप्यासह 101 जोडपी विवाहबद्ध झाली. याच सोहळ्यात प्रा. शिवाजीराव सावंत यांचे पुत्र ऋतूराज व आमदार तानाजीराव सावंत यांचे पुत्र ऋषिराज यांचाही विवाह पार पडला. 
या वेळी नव वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री महादेव जानकर, प्रा. शिवाजीराव सावंत, माजी आमदार विलास लांडगे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, शामल बागल, अर्जून पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, कल्याणराव काळे, संजय कोकाटे, रश्‍मी बागल, विलासराव घुमरे, शैला गोडसे, प्रा. सुहास पाटील, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. अजय दासरी, शिवसेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड, भाऊसाहेब आंधळकर, सुनील मोरे, ऍड. सोमनाथ वाघमोडे, सुहास पाटील जामगावकर, शंभूराजे साठे आदी उपस्थित होते.  सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. या सोहळ्यासाठी कालिदास सावंत, सुभाष सावंत, अनिल सावंत, किरण सावंत, धनंजय सावंत, रवी सावंत, विक्रम सावंत, पृथ्वीराज सावंत यांच्यासह भैरवनाथ शुगरचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

विवाहसोहळ्यासाठी खास आकर्षण 
सेलिब्रेटी म्हणून छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील येसूबाई अर्थात प्राजक्ता गायकवाड, सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव, सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे व मालिकेतील भय्यासाहेब अर्थात किरण गायकवाड उपस्थित होते. 

कोण काय म्हणाले 
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर : उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूप्रमाणेच जनतेचा जिव्हाळा आमदार तानाजीराव सावंत यांना मिळाला आहे. 
माजी मंत्री महादेव जानकर : या सोहळ्याच्या माध्यमातून सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम सावंत परिवारकडून सातत्याने 20 वर्षे होत आहे.

loading image