
सोलापूर : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (ता. २४) दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेला सुरुवात झाली. दहावी पुरवणी परीक्षेसाठी शहरातील एक तर ग्रामीण भागामध्ये सात परीक्षा केंद्र आहेत. दहावी पुरवणी परीक्षा सुटीचे दिवस वगळता आठ जुलैपर्यंत चालणार आहेत. या परीक्षेसाठी एक हजार ४६५ विद्यार्थी बसले आहेत.