Solapur News : मित्रपक्षाच्या राजकीय घावाने काँग्रेस घायाळ

पंढरपूर, शहर उत्तरनंतर आता ‘दक्षिण’वर डोळा; ११ पैकी तीनच मतदारसंघ काँग्रेसकडे
11 constituency out of only 3 constituency to congress solapur politics ncp
11 constituency out of only 3 constituency to congress solapur politics ncp esakal

Solapur News: आघाडीतील जागा वाटपानुसार सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसकडे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, शहर मध्य व पंढरपूर- मंगळवेढा हे विधानसभा मतदारसंघ होते. पण, शहर उत्तर व पंढरपूर- मंगळवेढा दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेले.

आता महाविकास आघाडीत शिवसेनेने दक्षिण सोलापूरवर डोळा ठेवला आहे. त्यामुळे एकेकाळच्या देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाकडे (काँग्रेस) जिल्ह्यातील दोनच मतदारसंघ राहतील, अशी बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर- मंगळवेढा, सांगोला, शहर उत्तर, माढा, माळशिरस हे सहा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर करमाळा, बार्शी, दक्षिण सोलापूर हे तीन मतदारसंघ शिवसेनेकडे आणि अक्कलकोट, शहर मध्य हे दोन मतदारसंघ काँग्रेसकडे राहतील, अशी सद्य:स्थिती आहे.

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विरोधकांना सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सहजपणे सुटेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, पूर्वानुभव पाहता जागा वाटपावरून स्वबळावर लढण्याची भाषा भविष्यात नेत्यांकडून वापरली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.

दरम्यान, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सुरेश हसापुरे किंवा चेतन नरोटे यापैकी एकाला निवडणुकीत उतरविण्याच्या दृष्टीने नियोजन केल्याचे बोलले जात आहे. पण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी अमर पाटील यांच्याशी साधलेल्या संवादातून पक्षाकडून तेच उमेदवार असतील, हे स्पष्ट केले आहे.

11 constituency out of only 3 constituency to congress solapur politics ncp
Solapur News : अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच उभारा; आमदार देशमुख-शिंदे विधानसभेत आक्रमक

परंतु, त्याठिकाणी माजी आमदार दिलीप माने यांच्याही नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीने (शरद पवार गट) पंढरपूर- मंगळवेढ्यातून अभिजित पाटील उमेदवार असतील असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. शहर उत्तरमधून महेश कोठेंना उमेदवारी मिळू शकते. करमाळा व बार्शीतही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

सांगोल्यात राष्ट्रवादीने (अजित पवार गट) उमेदवाराचा शोध सुरू केल्याची चर्चा आहे. तर शिवसेनेकडून (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) विद्यमान आमदार शहाजी पाटील यांनाच उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांचे मत आहे.

11 constituency out of only 3 constituency to congress solapur politics ncp
Solapur Crime: शेतीच्या वादातून सोलापुरात भीषण कांड; चुलत्याचं शीर हातात घेऊन बाईकवरुन फिरत होता तरुण

मोठा भाऊ राहिलेल्या काँग्रेसची दयनीय स्थिती

राजकारणात ‘जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी असे म्हटले जाते. ज्या पक्षाचे आमदार जास्त, त्यांचाच मुख्यमंत्री असे समीकरण आहे. मात्र, नेहमीच राज्याच्या सत्तेत मोठा भाऊ राहिलेल्या काँग्रेसला मित्र पक्षांकडूनच घेरण्याचा डाव कितपत यशस्वी होणार की जागा वाटपावरून काँग्रेस स्वबळाची भाषा करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

लोकसभेच्या निकालावर विधानसभेचे जागावाटप?

सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असून याठिकाणी दोनदा काँग्रेसला पराभव सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ देखील राष्ट्रवादीला द्यावा, अशी मागणी यापूर्वी झाली होती. आता आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव जवळपास फायनल झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे.

त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल का? त्याला कोणत्या विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळतात, यावरून विधानसभेचे जागा वाटप निश्चित होईल, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com