सोलापूर ग्रामीण मध्ये 11 जणांचा मृत्यू 

corona
corona
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 460 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 194 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये 266 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 11 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 266 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण बाधितांची संख्या आता 26 हजार 940 झाली आहे. त्यापैकी 21 हजार 145 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या 5 हजार 54 जणांवर उपचार सुरू आहेत. 741 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना चाचणीचे 86 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. 

आज मृत झालेल्या व्यक्तींमध्ये अक्कलकोट तालुक्‍यातील समर्थनगर येथील 22 वर्षिय पुरुष, माढा तालुक्‍यातील टेंभुर्णी येथील 75 वर्षिय पुरुष, मंगळवेढा तालुक्‍यातील नंदेश्वर येथील 58 वर्षिय पुरुष, मोहोळ तालुक्‍यातील मिरी येथील 46 वर्षिय पुरुष, करमाळा तालुक्‍यातील अंजनडोह येथील 25 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील माळीनगर येथील 62 वर्षिय पुरुष, माढा तालुक्‍यातील शेडशिंगे येथील तीस वर्षिय पुरुष, मंगळवेढा तालुक्‍यातील ब्रह्मपुरी येथील 86 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शिंगडगाव येथील 63 वर्षिय पुरुष, मोहोळमधिल अनगर येथील 85 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील कोळेगाव येथील 65 वर्षीय महिला यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com