
सोलापूर : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याचा कायदा विधीमंडळाने मंजूर केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर झालेल्या प्रभाग रचना रद्द होण्याच्या मार्गावर असताना जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व एका नगरपंचायतीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर केली आहे. या प्रारूप प्रभागरचनेचे भविष्य काय? हा प्रश्न सध्या तरी अधांतरीच आहे. बुधवारी (ता.९) सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासनाने पत्राची वाट पाहिली परंतु पत्र न मिळाल्याने जुन्या वेळापत्रकाप्रमाणे आज प्रारूप प्रभागरचना जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा/नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली आहे. त्यामध्ये अ वर्गातील बार्शी नगरपरिषद, ब वर्गातील पंढरपूर, अक्कलकोट व अकलूज नगरपरिषद, क वर्गातील सांगोला, मंगळवेढा, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ नगरपरिषद व अनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आणि नव्याने प्रभागरचना करण्याचे विधेयक विधीमंडळाने मंजूर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपरिषदांची प्रारूप प्रभागरचना जाहीर होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उद्या जाहीर होणाऱ्या प्रारूप प्रभागरचनेवर १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. २२ मार्चपर्यंत हरकतीवर सुचनांवर सुनावणी घेऊन १ एप्रिलपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे.
करमाळा नगरपरिषद
करमाळा : करमाळा नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. २० जागांसाठी येथे निवडणूक होणार असून त्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरु आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १७ जागा होत्या. या वर्षी ३ जागा वाढल्या आहेत. करमाळा नगरपालिकेत महिलांसाठी १० जागा, अनुसूचित जातीसाठी ३ जागा तर अनुसूचित जाती महिलांसाठी २ व सर्वसाधारण महिलांसाठी ८ जागा असणार आहेत. १० प्रभागातून २० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. गुरुवारी (ता. १०) प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाला असून यावर १७ मार्चपर्यंत हरकती घेता येणार आहेत.
करमाळा नगरपरिषदेची प्रभागनिहाय लोकसंख्या
प्रभाग क्रमांक १ : लोकसंख्या -२५१७, अनुसूचित जाती ३८७, अनुसूचित जमाती ३७. प्रभाग क्रमांक २ : लोकसंख्या -२१९१, अनुसूचित जाती १०९ , अनुसूचित जमाती ०. प्रभाग क्रमांक ३ : लोकसंख्या- २१९०, अनुसूचित जाती ९१ अनुसूचित जमाती ०. प्रभाग क्रमांक ४ : लोकसंख्या- २५११,अनुसूचित जाती १५८, अनुसूचित जमाती २८. प्रभाग क्रमांक ५ : लोकसंख्या -२२९५, अनुसूचित जाती ८६, अनुसूचित जमाती ४४. प्रभाग क्रमांक ६ : लोकसंख्या- २२६३, अनुसूचित जाती ५३४, अनुसूचित जमाती १०. प्रभाग क्रमांक ७ : लोकसंख्या -२४८३, अनुसूचित जाती ७७९, अनुसूचित जमाती २११. प्रभाग क्रमांक १० : लोकसंख्या- २५०६, अनुसूचित जाती १०७६, अनुसूचित जमाती २३
मोहोळ नगरपरिषद
मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. २० जागांसाठी ही निवडणूक होणार असून एका प्रभागात दोन याप्रमाणे एकूण दहा प्रभागात ही निवडणूक होणार आहे. दरम्यान २० नगरसेवकांपैकी ५० टक्के आरक्षणाप्रमाणे १० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
यापूर्वी १७ वॉर्ड होते. त्या ऐवजी आता १० प्रभाग झाले आहेत. अनुसूचित जातीसाठी ३, तर अनुसूचित जमातीसाठी २ दोन, एकूण ९ जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित झाल्या आहेत. तसेच प्रभाग व त्याची व्याप्ती जाहीर झाली आहे.
मोहोळ नगर परिषदेची प्रभागनिहाय लोकसंख्या
प्रभाग क्रमांक १ : एकूण लोकसंख्या -२४२६ अनुसूचित जाती- १५८ अनुसूचित जमातीसाठी - १७. प्रभाग क्रमांक २ : एकूण लोकसंख्या- २६९०, अनुसूचित जाती २६२, अनुसूचित जमाती - ७. प्रभाग क्रमांक ३ : एकूण लोकसंख्या - ३००८, अनुसूचित जाती ११९३. प्रभाग क्रमांक ४ : एकूण लोकसंख्या - २७५३, अनुसूचित जाती - ६९३, अनुसूचित जमाती - २१. प्रभाग क्रमांक ५ : एकूण लोकसंख्या - ३१३४, अनुसूचित जमाती - १०००, अनुसूचित जाती - १८. प्रभाग क्रमांक ६ : एकूण लोकसंख्या - २५१५, अनुसूचित जाती - १२. प्रभाग क्रमांक ७ : एकूण लोकसंख्या - २६११, अनुसूचित जाती - १४९, अनुसूचित जमाती - ४२ . प्रभाग क्रमांक ८ : एकूण लोकसंख्या - २६५५, अनुसूचित जाती - ३८४, अनुसूचित जमाती - २१८. प्रभाग क्रमांक ९ : लोकसंख्या - ३०८३, अनुसूचित जाती ३६०, अनुसूचित जमाती ९५. प्रभाग क्रमांक १० : एकूण लोकसंख्या - २९५८, अनुसूचित जाती - ३७२, अनुसूचित जमाती - ५
सांगोला नगरपरिषद
सांगोला : सांगोला नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली असून ११ प्रभागातून २३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. या नव्या प्रारुप रचनेमुळे सामान्यासह नेतेमंडळींमध्ये राजकीय चर्चेंना उधाण आले आहे.
सांगोला नगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच १० ऐवजी ११ प्रभागातून एकूण २० ऐवजी २३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर सूचना व हरकती नंतरच प्रभाग रचना अंतिम होईल. परंतु, सांगोला नगरपालिका प्रशासकीय इमारतीत नगरपालिकेची प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आल्याने खऱ्या अर्थाने नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे शहरात वाहण्यास सुरुवात झाली आहे.
सांगोला नगरपालिकेसाठी दहा प्रभागातून प्रत्येक प्रभागातून दोन असे एकूण २० नगरसेवक निवडून दिले जात होते. परंतु यंदा प्रथमच १० ऐवजी निवडणूक प्रशासनाने शहरात ११ प्रभाग केले आहेत. या पैकी प्रभाग एक ते १० मधून प्रत्येक प्रभागातून दोन असे २० तर प्रभाग क्रमांक ११ हा विस्ताराने मोठा केल्याने या प्रभागातून ३, असे एकूण २३ सदस्य आगामी निवडणुकीत नगरसेवक होणार आहेत.
निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने २३ पैकी सुमारे १२ जागा या महिलांसाठी आरक्षित असतील. तर अनुसूचित जातीसाठी शहराच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता ३ सदस्य राखीव ठेवण्यात येतील. शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये २९०१ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील ९७० इतकी लोकसंख्या आहे. प्रभाग क्रमांक तीनमधील ३०५९ एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या १ हजाल २९८ इतकी तर शहरात एकमेव त्रिसदस्यीय असलेल्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये ४ हजार ३३१ लोकसंख्येपैकी ५८५ इतकी आहे. त्यामुळे प्रभाग दोन, तीन व ११ मध्ये प्रत्येकी एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बार्शी नगरपरिषद
बार्शी : बार्शी नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करण्यात केली असून प्रभाग रचनेनुसार २१ प्रभागात ४२ नगरसेवक आहेत. अनुसूचित जातीसाठी ७ तर नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच अनुसूचित जमातीसाठी एक जागा आरक्षित असणार आहे, अशी माहिती नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी दिली.
शहरातील २१ प्रभागाचे प्रारुप, लोकसंख्या, चतु:सिमा, नकाशे निश्चित करुन त्याचे प्रारुप मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यामार्फत निवडणूक आयोगाने या प्रारुपास मान्यता दिली आहे. प्रारुप प्रभाग रचनेनुसार १० मार्च ते १७ मार्च या कालावधीत नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. २१ प्रभागात प्रत्येकी दोन याप्रमाणे ४२ नगरसेवक असणार आहेत. प्रत्येक प्रभागात एक महिला असणार आहे. ४२ जागांमध्ये अनुसूचित जाती ७ जागा आहेत. यातील ४ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी असणार आहेत. सर्वसाधारण महिलेसाठी १७ जागा आरक्षित केल्या असून उर्वरित जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असणार आहेत. एक प्रभाग ५ हजार ६५३ इतक्यापर्यंत लोकसंख्येचा असून २०११च्या जनगणनेनुसार १ लाख १८ हजार ७२२ शहराची लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे. हरकतीच्या सूचना १७ मार्चपर्यंत घेण्यात येणार असून त्याची २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांचेकडे सूनावणी होईल. जिल्हाधिकारी २५ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवतील निवडणूक आयोगाची मान्यता १ एप्रिल २०२२ रोजी मिळेल. जिल्हाधिकारी अंतिम सूचना ५ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करतील, असेही दगडे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
मंगळवेढा : नगरपालिकेच्या संभाव्य निवडणुकीच्या दृष्टीने प्रारुप प्रभाग रचना निश्चित करण्यात आली. त्यामध्ये नव्याने तीन सदस्यांची वाढ झाली असून आता वीस सदस्यासाठी दहा प्रभाग निश्चित करण्यात आले.
शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शासनाच्या नव्या आदेशाप्रमाणे तीन सदस्यांची वाढ झाली आहे. याबाबत प्रभाग रचनेचे नगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे त्यावर दावे आणि हरकतीनंतर हे प्रभाग अंतिम होणार आहे. त्यानंतर राजकीय मोर्चेबांधणीला वेग घेण्यास सुरुवात होणार आहे. प्रभाग ७ मध्ये एक ही मागासवर्गीय लोकसंख्या नाही. २१ हजार ८२४ लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये २६२९ लोकसंख्या ही मागासवर्गीयांची आहे. तर एसटी प्रवर्गाची १९० लोकसंख्या आहे.
दहा प्रभागामधून सदस्य निवडताना प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य निवडले जाणार आहे. या निवडणुकीतून विजयी होणाऱ्या नगरसेवकांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळणार असल्यामुळे नगरसेवक होण्यासाठी अनेकांनी कंबर कसण्यास सुरवात केली आहे.
कुर्डुवाडी नगरपरिषद
कुर्डुवाडी : कुर्डुवाडी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता प्रभाग रचना प्रारुप आराखडा नगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आला असून १० प्रभागातून २० सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. याबाबत सूचना व हरकती घेण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०२२ आहे.
प्रसिद्ध केल्यानुसार प्रभाग रचना आराखडा, लोकसंख्या व व्याप्ती काही महत्वाची ठिकाणे कंसात : प्रभाग क्रमांक १ : एकूण लोकसंख्या - २ हजार २९३, अनुसुचित जाती लोकसंख्या- ९७३, अनुसुचित जमाती लोकसंख्या- २१, (बौद्ध विहार करमाळा रोड, ओम हॉस्पिटल, रेल्वे स्लीपर गोडावून, देवकते वस्ती, जाधव मळा, सेंट मेरीज चर्च, रेल्वे शाळा मागे). प्रभाग क्रमांक २- एकूण लोकसंख्या- २ हजार १७६, अनुसुचित जाती लोकसंख्या- ७४१, अनुसुचित जमाती लोकसंख्या- ४५ (रेल्वे ग्रंथालय, नालसाब नगर बार्शी नाका, श्रीराम मंदिर परिसर, पाचकोठडी, राऊत वस्ती, भूतबंगला, रेल्वे बिल्डिंग). प्रभाग क्रमांक ३- एकूण लोकसंख्या- २ हजार ४१६, अनुसुचित जाती लोकसंख्या- ८३८, अनुसुचित जमाती लोकसंख्या- ४१ (रेल्वे कॉलनी, रेल्वे कारखाना, आवताडे वस्ती, टोणपे मळा, चौधरी वस्ती, गवळी वस्ती, भैय्याचे रान, शुभम नगर). प्रभाग क्रमांक ४ - एकूण लोकसंख्या- २ हजार १७९, अनुसूचित जाती लोकसंख्या- ५३५, अनुसुचित जमाती लोकसंख्या- २० (आवताडे वसाहत, सिद्धेश्वर नगर, जिजामाता नगर, देवकते, लेंगरे पारखे वस्ती, जंजिरे मदने पोळके वस्ती, मार्केट यार्ड हमाल चाळ). प्रभाग क्रमांक ५- एकूण लोकसंख्या- २ हजार ३०८, अनुसुचित जाती लोकसंख्या -१८०, अनुसुचित जमाती लोकसंख्या- २५ (शिक्षक सोसायटी, गोल काडादी चाळ, भूषण लॉज लाईन, चौधरी प्लॉट, आंतरभारतीजवळ, साई कॉलनी). प्रभाग क्रमांक ६- एकूण लोकसंख्या- २ हजार २९९, अनुसुचित जाती लोकसंख्या- ४४७, अनुसुचित जमाती लोकलंख्या- ३२ (पोलिस स्टेशनजवळ, खाटीक गल्ली, नेहरु नगर, पोस्ट रोड, पंजाब तालीम, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. करंदिकर दवाखाना, श्री दत्त मंदीरजवळ). प्रभाग क्रमांक ७- एकूण लोकसंख्या- २ हजार २९०, अनुसुचित जाती लोकसंख्या- २९७, अनुसुचित जमाती लोकसंख्या- ३४ (डॉ. कुंतल शहा नगर, दाळवाले गल्ली, एस टी स्टॅंड, म्हसोबा गल्ली, बागल मळा, एसटी डेपो, श्रीशनीमंदीर, श्रीविठ्ठल मंदीर, मोहळकर चाळ). प्रभाग क्रमांक ८- एकूण लोकसंख्या- २ हजार ४४७, अनुसुचित जाती लोकसंख्या- ६६०, अनुसुचित जमाती लोकलंख्या-१४ (सिद्धार्थ नगर, अण्णाभाऊ साठे नगर, महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री बसवेश्वर चौक, तलाठी कार्यालय, मिठाई गल्ली, पटेल चौक, ब्राम्हण चाळ). प्रभाग क्रमांक ९- एकूण लोकसंख्या- २ हजार १२५, अनुसुचित जाती लोकसंख्या- ५३७, अनुसुचित जमाती लोकलंख्या- ३३ (गीताबाईचा मळा, बाळकृष्ण नगर, फिल्टर पंप, नूतन शाळा, दशरथ गोरे नगर, सरकारी दवाखानाजवळ). प्रभाग क्रमांक १०- एकूण लोकसंख्या- १ हजार ९३०, अनुसुचित जाती लोकसंख्या- १९३, अनुसुचित जमाती लोकलंख्या- २७ (यशवंत नगर, गॅस गोडावून, पाणी टाकीजवळ, परबत संकुल, माढा रोड). शहरातील एकूण लोकसंख्या- २२ हजार ४६३, अनुसुचित जाती लोकसंख्या ५ हजार ४०१, अनुसुचित जमाती लोकसंख्या २९२
पंढरपूर नगरपरिषद
पंढरपूर : नगरपालिकेच्या आगामी २०२१-२०२२ च्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी शहरातील १८ प्रभागांसाठीची प्रारुप रचना आज जाहीर करण्यात आली. या प्रारुप रचनेच्या संदर्भात १७ मार्चपर्यंत हरकती सूचना देता येणार आहेत. येत्या निवडणुकीत अठरा द्विसदस्यीय प्रभागातून ३६ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे.
पंढरपूर नगरपालिकेची आगामी पंचवर्षिक निवडणूक घेण्याच्या दृष्टीने प्रभागांची प्रारुप रचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि मुख्याधिकारी अरविंद मुळे यांच्या वतीने जाहीर करण्यात आली. २०११ च्या जनगणनेनुसार तयार करण्यात आलेल्या या प्रभाग रचनांचा तपशील आज नगरपालिका सभागृहात नागरिकांच्या माहितीसाठी ठेवण्यात आली तसेच पालिकेच्या संकेतस्थळावर ही अपलोड करण्यात आली.
प्रभाग क्रमांक, लोकसंख्या आणि प्रत्येक प्रभागाच्या सीमा रचना पुढीलप्रमाणे
प्रभाग एक (लोकसंख्या ५०७३) : भटुंबरे हद्द, पूर्व अनिल नगर झोपडपट्टी, भगवती देवी मंदिर, अनिल नगर पाण्याची टाकी, माने दवाखानारस्ता, जाधव घर पूर्व रस्ता, पोपट वाघमोडे घर, लेंडकी नाला, चौगुले घर, भीमा माळी घर, धुळदेव मंदिर, भोसले आईस फॅक्टरी ते स्वराज ट्रॅक्टर शोरुम, जुना अकलूज रस्ता, चंद्रभागा बस स्थानक ते मलपे ओढा
प्रभाग क्रमांक दोन (लोकसंख्या ५०४६) : भीमा माळी घर ते चौगुले घर, नामानंद मठ ते जाधव घर, मीराबाई मठ ते भुयाचा मारुती ते अंडेवाले घर, जुनी पेठ तालीम रस्ता, जुनी पेठ पोलिस चौकी ते पाटोळे लॉन्ड्री रस्ता, डॉक्टर ननवरे दवाखाना, जुनी पेठ पोलिस चौकी, जुने कोर्ट, अर्बन बॅंक ते भोसले आईस फॅक्टरी रस्ता, धुळदेव मंदिर ते भीमा माळी घर, चौगुले घर ते नामानंद मठ, जाधव घर ते मीराबाई मठ
प्रभाग क्रमांक तीन (लोकसंख्या ५५३९) : भटुंबरे हद्द, शेगाव दुमाला हद्द, ६५ एकर, अंबाबाई पटांगण, पाण्याची टाकी, बलभीम नेहतराव घर, अंडीवाले घर रस्ता ते भुयाचा मारुती, भुयाचा मारुती ते मिराबाई मठ
प्रभाग क्रमांक चार (लोकसंख्या ५४४३) : रामबाग दवाखाना जुना, व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई देवी मंदिर, ६५ एकर, शेगाव दुमाला हद्द, क्रांती चौक ते थोरात चौक, राघवेंद्र मठ ते लखुबाई मंदिर, लखुबाई मंदिर ते इस्कॉन मंदिर, क्रांती चौक ते जुनीपेठ चौक, जुनी पेठ ते सर्वे नंबर १९७ ब पर्यंत, बलभीम नेहतराव ते मारुती मंदिर
प्रभाग क्रमांक पाच (लोकसंख्या ५११६) : क्रांती चौक ते थोरात चौक , राघवेंद्र महाराज मठ ते लखुबाई मंदिर, लखुबाई मंदिर ते इस्कॉन मंदिर, शेगाव दुमाला हद्द, श्री विठ्ठल मंदिर, दगडी पाण्याचा हौद ते टिपटॉप लॉन्ड्री ते हरिव्दार हॉटेल ते कासार घाट ते म्हसोबा मंदिर, टिपटॉप लॉन्ड्री ते श्री विठ्ठल मंदिर, सांगोलकर घर ते श्यामसुंदर दुकान, भजनदास चौक ते भिंगे घर, भिंगे घर ते क्रांती चौक
प्रभाग क्रमांक सहा (लोकसंख्या ५६७३) : लाड पेढेवाले, कासार घाट, म्हसोबा मंदिर, शेगाव दुमाला, भाई भाई चौक ते सम्राट चौक रस्ता, आंबेडकर नगर पाण्याची टाकी ते मध्यप्रदेश भवन, मध्यप्रदेश भवन ते गोपाळपूर रोड, आंबेडकर नगर पाण्याची टाकी पश्चिम बाजू ते वायदंडे घर ते हमीद बागवान घर, भाई भाई चौक ते गुजराथी कॉलनी, बडवे घर ते मक्का मश्चिद, श्री कालिकादेवी चौक ते हरिव्दार हॉटेल प्रदक्षिणा मार्ग
प्रभाग क्रमांक सात (लोकसंख्या ५९१५) : शिवाजी चौक ते श्री विठ्ठल मंदिर पश्चिमव्दार, नामदेव पायरी शॉपिंग सेंटर, दगडी पाण्याचा हौद, हरिव्दार हॉटेल ते कालिकादेवी मंदिर, श्री कालिकादेवी मंदिर ते मुर्शदबाबा दर्गा, श्री विठ्ठल मंदिर सात मजली इमारत, दगडी पाण्याचा हौद, हरिद्वार हॉटेल ते कालिकादेवी मंदिर, कालिकादेवी मंदिर ते मुर्शदबाबा दर्गा, महात्मा फुले चौक ते गौतम विद्यालय रस्ता,शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक रस्ता
प्रभाग क्रमांक आठ, (लोकसंख्या ५०१९) : जुने मोहिते हॉस्पिटल ते सेंट्रल नाका, गांधी मोबाईल शॉपी ते भादुले चौक, नगरपरिषद कार्यालय ते समर्थ आर्ट गांधी रोड रस्ता, नाथ चौक ते श्यामसुंदर दुकान, श्यामसुंदर दुकान ते सांगोलकर घर ते श्री विठ्ठल मंदिर पश्चिमव्दार, ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी, भाकरे हॉस्पिटल, सुधाकरपंत परिचारक सभागृह पश्चिमबाजू रस्ता, जैन मंदिर , शिक्षक पतसंस्था कार्यालय, शामीयाना हॉटेल रस्ता
प्रभाग क्रमांक नऊ (लोकसंख्या ५०६७) : साखरे दवाखाना ते नवरंगे बालकाश्रम रस्ता, जुनी पेठ पोलिस चौकी ते जुनी पेठ तालीम ते क्रांती चौक ते भिंगे घर, भिंगे घर ते भजनदास चौक, समर्थ आर्ट गांधी रोड, नाथ चौक ते भजनदास चौक, समर्थ आर्ट ते यशोदा शॉपिंग सेंटर, भादुले चौक ते नायर पंक्चर दुकान , सेंट्रल नाका ते जुने मोहिते हॉस्पिटल पिछाडी, जिजामाता शॉपिंग सेंटर, शेटे पेट्रोल पंप ते सेंट्रल नाका, लेंडकी नाला
(उर्वरित प्रभागांचा तपशील उद्याच्या अंकात)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.