Solapur News : मिळकतदारांना विविध योजनांतून ११७ कोटींची सूट

सोलापूर महापालिकेचे वर्षभरात ३०८ कोटींचे उद्दिष्ट; ३३१ कोटींची वसुली
Solapur News
Solapur Newsesakal

सोलापूर : महापालिकेने सरत्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात विविध योजनांतून मिळकतदारांना दिलेल्या सवलतीपोटी मिळकतदारांची ११७ कोटी रुपयांची बचत झाली आहे. पालिकेच्या मिळकतकर विभागाच्या शिस्तबद्ध कारवाईमुळे ३०८ कोटींच्या उद्दिष्टापेक्षाही २३ कोटी रुपये अधिकची वसुली करण्यात आली. एकूण थकबाकी वसुलीपोटी २५० नळ तोडण्यात आले तर विविध २८ मिळकती सील करण्यात आल्या.

Solapur News
Health News : डोकेदुखीचे तब्बल 150 प्रकार असू शकतात; 17 कोटी लोकं या आजाराने त्रस्त

मिळकतकर विभागाने सरत्या आर्थिक वर्षात शास्ती वॉरंट फी व दंड माफीचा निर्णय घेताना थकबाकीदारांनी मिळकतकर भरण्यासाठी १०० टक्के शास्ती व दंड माफी योजना आणली. त्याला सोलापुरातील मिळकतकर थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद दिला. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेर ७४३ कोटी ५१ लाख रुपये वसुली थकीत होते, त्यापैकी ३०८ कोटी ७ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मिळकतकर विभागाने वर्षभरात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करत २३ कोटी रुपये अधिक वसुली केली. वर्षभरात ३३१ कोटी ६१ लाख ३७ हजार ५९० रुपये कर वसुली करण्यात आली आहे.

Solapur News
Mental Health: मेंटली चेकआउट म्हणजे काय? जाणून घ्या लक्षण अन् उपाय

वर्षभरात एकूण वसुली ३३१ कोटी ६१ लाख ३७ हजार ५९० रुपये झाली आहे. तसेच हस्तांतरण/ नाव दाखल व इतर शुल्कापोटी महापालिका तिजोरीत १२ कोटी ६ लाख ७१ हजार ९९४ रुपये जमा झाले आहेत. सरत्या आर्थिक वर्षात ३४३ कोटी ६८ लाख ९ हजार ५८४ रुपये महापालिका तिजोरीत जमा झाले.

Solapur News
Summer Health Tips : कैरी, चिंच, गुळाचे पन्हे उन्हाळ्यात घ्याच! आयुर्वेदाचार्याचा सल्ला

थकबाकीच्या फुगलेल्या आकड्यातून दिलासा

महापालिका मिळकत कर विभागाने या वर्षभरात ५ टक्के, २५ टक्के, शास्ती, वॉरंटफी व दंडामध्ये शंभर टक्के माफीची योजना लागू केली होती. वर्षभरात एकूण ११६ कोटी ९१ लाख ३२ हजार ८८५ रुपये सूट मिळकतदारांना देण्यात आली. या योजनेमुळे मिळकतदारांमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेचा मिळकत कर थकबाकीचा फुगलेला आकडा हळूहळू कमी होत असल्याचे दिसत आहे. थकबाकी पोटी झालेल्या वसुलीतून शहराच्या विकासात महापालिका प्रशासनास हातभार लावण्यास मोठी मदत होणार आहे.

अशी आहे वर्षभराची वसुली व सूट

गवसू विभागाअंतर्गत एकूण ४ कोटी ७५ लाख रुपये वसुली

वॉटर मीटर, पाणीपट्टी ९ कोटी ८९ लाख ५१ हजार ३४७ रुपये वसुली

शिल्लक आरटीजीएस १ लाख ८६ हजार रुपये

शिल्लक धनादेशापोटी ५० लाख रुपये

एकूण तब्बल ११६ कोटी ९१ लाख ३२ हजार ८८५ रुपयांची महापालिकेकडून मिळकतदारांना सूट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com