
सोलापूर : शहरातून ये-जा करताना वाहतूक नियम मोडणाऱ्या तब्बल १२ हजार वाहन मालकांना सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी दंड भरण्यासंदर्भातील समन्स बजावले आहे. २२ मार्च रोजी लोकअदालत आयोजित करण्यात आली असून त्यावेळी या बेशिस्त वाहन मालकांनी दंड भरणे अपेक्षित आहे, अन्यथा त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी दिला आहे.