Solapur: तेरा वर्षाचा अल्पवयीन घरातून गेला पळून;'पालकही कंटाळले मुलाच्या वर्तनाला', मुलगा नेमकं काय करायचा..

बसमध्ये एक तेरावर्षीय शाळकरी मुलगा लपून बसला होता. एसटी बसचे वाहक सचिन दुबे यांना तो आढळून आला. त्यांनी त्या मुलाची चौकशी केली असता तो बार्शी येथील रहिवासी असून, सातवीमध्ये शिकत असल्याचे त्यांना कळाले.
13-year-old boy runs away from home; behavioral issues cited as cause of family distress.
13-year-old boy runs away from home; behavioral issues cited as cause of family distress.Sakal
Updated on

वैराग : मोबाईल गेमच्या दुष्टचक्रामध्ये अडकून घरातून पळून गेलेल्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन शाळकरी मुलास अखेर बार्शी डेपोच्या वाहक व वैराग पोलिसांच्या मदतीने पालकांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना गुरुवारी (ता. ८) साडेपाचच्या सुमारास बार्शी- सोलापूर बसमध्ये घडली. वैराग बस डेपोमध्ये मुलाला उतरवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com