शैक्षणिक कर्जासाठी 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुणांची अट !

शैक्षणिक कर्जासाठी 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुणांची अट! 'विद्यालक्ष्मी'वर करा ऑनलाइन अर्ज
शैक्षणिक कर्जासाठी 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुणांची अट! "विद्यालक्ष्मी'वर करा ऑनलाइन अर्ज
शैक्षणिक कर्जासाठी 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुणांची अट! "विद्यालक्ष्मी'वर करा ऑनलाइन अर्जCanva
Updated on
Summary

आता शैक्षणिक कर्जासाठी विद्यार्थ्यांना दहावी व बारावीत 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुणांचे बंधन घालण्यात आले आहे.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल थेट पद्धतीने जाहीर झाला. मात्र, आता शैक्षणिक कर्जासाठी (Educational Loan) विद्यार्थ्यांना दहावी व बारावीत 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुणांचे बंधन घालण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 136 कोटी दहा लाखांचे शैक्षणिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना साडेचार लाखांपर्यंत कर्ज घेताना जामीनदार द्यावा लागणार नाही. परंतु, साडेचार ते साडेसात लाखांपर्यंतच्या कर्जासाठी जामीनदार तर त्यावरील कर्जासाठी मालमत्ता तारणाची अट घालण्यात आली आहे.

शैक्षणिक कर्जासाठी 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुणांची अट! "विद्यालक्ष्मी'वर करा ऑनलाइन अर्ज
रेल्वेमध्ये 400 हून अधिक प्रशिक्षणार्थी पदांची होणार भरती!

अभियांत्रिकीस अन्य शिक्षणासाठी संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश शासकीय कोट्यातून, सीईटीच्या माध्यमातून (मेरिट यादी) झालेला असायला हवा. शैक्षणिक कर्जासाठी पालक आणि संबंधित विद्यार्थ्यांचे संयुक्‍त खाते बॅंकेत उघडावे लागते. कर्जाची रक्‍कम न भरलेल्या त्या विद्यार्थ्याच्या पालकाकडून कर्ज वसूल करण्याची कारवाई बॅंकांनी हाती घेतली आहे. कोरोनामुळे शैक्षणिक कर्जवाटपात बॅंकांनी हात आखडता घेतला असून या कर्जाची थकबाकी वाढल्याचेही त्यामागे कारण आहे. तरीही, आता जेईई, नीट, सीईटी परीक्षा झाल्या असून त्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर 2021-22 च्या उद्दिष्टानुसार बॅंकांनी पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य द्यावे, अशा सूचना राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने दिल्या आहेत. कोरोनामुळे आधारहीन झालेल्यांना शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. बॅंक ऑफ इंडियाकडून विद्यार्थ्यांना साडेचार लाखांपर्यंत वार्षिक 9.35 टक्‍के व्याजदराने शैक्षणिक कर्ज दिले जाते, अशी माहिती अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी दिली.

बारावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी हुशार, होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून त्यांना हातभार लावला जातो. निकषांनुसार कर्जासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण व त्यासाठी येणाऱ्या खर्चावर आधारित पुरेसे कर्ज दिले जाईल.

- प्रशांत नाशिककर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, सोलापूर

शैक्षणिक कर्जासाठी 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुणांची अट! "विद्यालक्ष्मी'वर करा ऑनलाइन अर्ज
महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणीचे प्रवेशपत्र जाहीर!

कर्ज मिळविण्याची प्रक्रिया

  • दहावी-बारावीतील गुणांची टक्‍केवारी 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असावी

  • अभियांत्रिकी, वैद्यकीयसह अन्य अभ्यासक्रमांसाठी शासकीय कोट्यातून मेरिट यादीनुसार विद्यार्थ्यांचा प्रवेश असावा

  • शैक्षणिक कर्जासाठी विद्यार्थ्यांनी "विद्यालक्ष्मी'वर करावा ऑनलाइन अर्ज; जवळील बॅंकेकडेच करावा अर्ज

  • कर्ज मंजुरीपूर्वी त्या विद्यार्थ्याच्या वार्षिक शैक्षणिक खर्चाचे इस्टिमेट महाविद्यालयाने द्यावे बॅंकेला

  • साडेचार लाखांपर्यंत जामीनदार लागणार नाही, तर साडेसात लाखांपर्यंतच्या कर्जासाठी लागणार जामीनदार

  • साडेसात लाखांहून अधिक शैक्षणिक कर्जासाठी मालमत्ता तारण व जामीनदारांची अट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Police
Floating Solar Power Project Planned At Solapur Hipparga Lake To Generate Electricity Worth Rs 1 Crore Every Year
solapur city police
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com