Solapur Crime : मित्रांच्या वाढदिवसाची पार्टी आली अंगलट: पोलिसांना गांजासह सापडली दारू, १४ जणांवर गुन्हा

Solapur News: पोलिसांची गाडी दिसताच काहीजण तेथून पसार झाले. पोलिसांनी तेथून पाच जणांना ताब्यात घेतले. पार्टी केलेल्या जागेची पाहणी केली, त्यावेळी दारू व बिअरच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Solapur News
Alcohol and Cannabis at Friends Birthday PartySakal
Updated on

सोलापूर: येथील पत्रकार भवनजवळील मिलेट्री दवाखान्यासमोरील मिलेट्रीच्या मोकळ्या मैदानात रात्री बाराच्या सुमारास वीरेश गोटे व इंन्झमाम इनामदार या दोघांच्या वाढदिवसाची बेकायदा पार्टी करणाऱ्या १४ जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com