14 girls in Maharashtra are denied orphan certificates due to the requirement of a parental death certificate, leaving them without legal recognition of their orphan status."Sakal
सोलापूर
Certificate of Orphan : ‘त्या’ १४ मुलींना मिळेना अनाथाचे प्रमाणपत्र: आई-वडिलांच्या मृत्यूच्या दाखल्याची अट
आई-वडिलांबद्दल काहीही माहिती नसताना त्या मुलींना त्यांच्या पालकांचा मृत्यू दाखला आणायला सांगण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागीय उपायुक्तांनीच हात वर केल्याने आई-वडिलांविना शिकलेल्या त्या मुलींना १२ महिन्यानंतरही अनाथ प्रमाणपत्र मिळालेले नाही.
सोलापूर : लातूर, सांगली, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर (पंढरपूर) या जिल्ह्यांमधील जवळपास १४ मुलींना अनाथ असल्याचे सिद्ध करण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. आई-वडिलांबद्दल काहीही माहिती नसताना त्या मुलींना त्यांच्या पालकांचा मृत्यू दाखला आणायला सांगण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागीय उपायुक्तांनीच हात वर केल्याने आई-वडिलांविना शिकलेल्या त्या मुलींना १२ महिन्यानंतरही अनाथ प्रमाणपत्र मिळालेले नाही.

