Solapur: मैत्री, धर्मरक्षण अन् पराक्रमाचा संदेश; छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीत १४ मंडळांचा सहभाग
दुपारी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मिरवणुकांना मोठ्या उत्साहात सुरवात झाली. छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव यांनी धर्मवीर संभाजीराजेंच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर मिरवणुका हळूहळू पुढे सरकत होत्या.
Rally participants pay homage to Chhatrapati Sambhaji Maharaj with vibrant displays of courage, unity, and cultural pride.Sakal
सोलापूर : स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या ३६८ व्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीतील देखाव्यातून त्याग, धर्मरक्षण, मैत्री व पराक्रमाचा संदेश विविध मंडळांनी दिला. तरुणाईच्या गर्दीने मिरवणुकीचा उत्साह द्विगुणित झालेला दिसून आला.