
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प सोलापुरातील रे-नगरात होत आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजार २४ कामगारांची घरे बांधून पूर्ण असून आता दुसऱ्या टप्प्यातील आठ हजार घरकुलांचे काम सुरू आहे. या वर्ष अखेरपर्यंत दुसरा टप्पाही पूर्ण होईल, अशी माहिती ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी दिली.