सोलापूर ग्रामीमध्ये 151 नवे कोरोनाबाधित, तिघांचा मृत्यू 

logo
logo
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 861 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 710 अहवाल निगेटिव्ह आले असून 151 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 107 जण एकाच दिवशी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोना चाचणीचे 47 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 36 हजार 161 झाली आहे. त्यातील एक हजार 53 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 574 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 33 हजार 534 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ग्रामीण भागातील 12 हजार 23 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. इन्स्टीट्युन्शल क्वारंटाईनमध्ये सध्या 2 हजार 908 जण आहेत. आजच्या अहवालांमध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये सांगोला तालुक्‍यातील शिवणे येथील 61 वर्षिय पुरुष, मोहोळ तालुक्‍यातील टाकळी सिकंदर येथील 68 वर्षिय पुरुष आणि माळशिरस तालुक्‍यातील वेळापूर येथील 60 वर्षिय पुरुषाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com