
सोलापूर : घोरपडीच्या अवयवाच्या तस्करीप्रकरणी सोलापूर रेल्वे स्थानकावर बीड जिल्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. घोरपडीच्या गुप्तांगास हत्थाजोड म्हणून ओळखले जात असून, याचा वापर काळ्या जादूसाठी केला जातो. रविवारी सोलापूर वन विभागाने १५१ हत्थाजोड व एक चारचाकी मोटार जप्त केली आहे.