Arav Jhonjat from Solapur : सोलापूर शहरातील बुधवार पेठ येथे राहणाऱ्या आरव जौंजटने स्किलडो खेळातील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. वयाच्या पंधराव्या वर्षातच त्याने अनेक स्पर्धेत सहभाग घेत विविध पदके प्राप्त केली आहेत..तो सद्य:स्थितीला रावजी सखाराम प्रशालेत इयत्ता नववीत शिकत असून भविष्यातील मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्याचे स्वप्न असून सुवर्ण पदक प्राप्त करण्याची जिद्द असल्याचे आरवणे सांगितले.शालेय स्तरावरील जिल्हा स्तरीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्याने विविध सुवर्ण, रौप्य तर कस्य पदके आपल्या नावावर केली आहेत. लहान पणापासून खेळाची आवड असल्यामुळे त्याने स्किलडो या खेळाला वयाच्या आठव्या वर्षापासून सुरुवात केली. .सद्य:स्थितीला शालेय वेळातच त्याचा सराव होत असून या खेळाच्या सरावातील सातत्याने राष्ट्रीय पातळीवर सोलापूरचे नाव करत आता पुढील मोठ्या स्पर्धेत आणखीन चांगली कामगिरी करणार असून तसा प्रयत्न करत आहे.कुटुंबामध्ये आरव यांचे आजोबा संभाजी जौंजट यांच्या कडून कुस्ती खेळाची परंपरा मिळाली आहे, तो आजोबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत वडिल आनंद जौंजट यांनी आरव याला स्किलडो या खेळाचे प्रशिक्षण घेण्यास प्रौत्सहन देण्यास सुरुवात केली. या खेळातील मोठ्या स्पर्धेत यश संपादन करून आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करणार असल्याचे तसा प्रयत्न करत असून यामध्ये निश्चितच यश मिळणार असल्याचे सांगितले..विविध स्पर्धेत अनेक पदके मिळवत आरवचे स्किलडो खेळात यशशालेय स्तरावरील स्पर्धेत त्याने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे. यामध्ये अनेक स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कास्य असे एकूण नऊ पदक प्राप्त केले आहेत. यामध्ये जिल्हा स्तरावरील स्पर्धेत दोन सुवर्ण तर एक कास्य पदक मिळविले आहे. राज्य स्तरीय स्पर्धेत तीन सुवर्ण तर एक रौप्य पदक पटकाविले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्य पदक संपादन केले आहे.स्किलडोचा इतिहासस्किल डो हा भारतामध्ये तयार झालेला आहे ज्या ठिकाणी मार्शल आर्टचा जन्म झाला अशा ठिकाणचा खेळ असून आज जगभरातील 22 देशांमध्ये स्किल्डो मार्शल आर्ट हा खेळ खेळला जातो ग्रँडमास्टर डॉ. संभाजी मस्के यांनी अथक 25 वर्ष या स्किल डो मार्शल आर्ट वर अभ्यास करून स्किल डो मार्शल आर्ट ची निर्मिती केली. आज महाराष्ट्र राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये 35 हजार विद्यार्थी सराव करत आहेत देशभरामध्ये 18 राज्यांमध्ये 2100 ब्रांचेस आहेत. 22 देशांमध्ये स्किल डो मार्शल आर्ट हा खेळ खेळला जातो चालू शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय स्किल डो ची मान्यता मिळाली आहे आणि लवकरच ऑलिंपिक मध्ये सहभागी होईल असे प्रयत्न चालू आहेत.लहान पणापासून खेळाची आवड होती. तसेच कुटुंबामध्ये खेळाची परंपरा आहे. आजोबा यांच्यापासून मला नेहमी प्रेरणा मिळाली आहे. आई आणि वडिल तसेच कुटुंबियांकडून नेहमीच खेलासाठी प्रोत्साहन मिळत आहे. खेळामध्ये बुद्धराज ढेपे यांचे प्रशिक्षण मिळत असून भविष्यातील अंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.- आरव जौंजट, अंतरराष्ट्रीय खेळाडू.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.