सोलापूर : दयानंद महाविद्यालयाच्या वसतिगृहात १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनाला कंटाळल्याची चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. २२) सायंकाळी ७.१५ च्या सुमारास उघडकीस आली. स्नेहा सौदागर गायकवाड (रा. तरटगाव, पोस्ट उळे, सोलापूर) असे मयत मुलीचे नाव आहे.