बेंबळेच्या समाधान पाटलांनी केले गोमूत्र अर्काचे २१ प्रकार विकसित

स्वतःला आजारातून गो-उत्पादनाच्या मदतीने बरे झाल्यानंतर त्यांनी हे संशोधन केले
21 varieties of cow urine extract were developed by Samadhan Patil of Bemble
21 varieties of cow urine extract were developed by Samadhan Patil of Bemble

सोलापूर - बेंबळे (ता. माढा) येथील समाधान पाटील यांनी अर्काची मूलभूत निर्मिती पद्धतीत नवे संशोधन करून गोमूत्र अर्काचे एकूण २१ प्रकार विकसित केले आहेत. स्वतःला आजारातून गो-उत्पादनाच्या मदतीने बरे झाल्यानंतर त्यांनी हे संशोधन केले.

समाधान पाटील यांची स्वतःची शेती आहे. पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांचे वजन झपाट्याने कमी होऊन पित्ताशयात खडे झाल्याचे निदान झाले. त्यांनी गाईच्या दुधाचा उपयोग करून केलेले उपचार यशस्वी झाले. तेव्हा त्यांनी गाईच्या उत्पादनावर काम करून बघू, असा विचार केला.

त्यांनी जर्सी गाई विकून १२ खिलार गाई विकत घेतल्या. सुरवातीला त्यांनी सांगलीला जाऊन पंचगव्य निर्मिती प्रशिक्षण घेतले. शेतातच त्यांनी गोमूत्र अर्काच्या निर्मितीमध्ये संशोधन सुरू केले. औषधी गुणधर्माच्या वनस्पतीचा अभ्यास करून त्यांनी त्यांचा उपयोग अर्क निर्मितीसाठी केला. त्यामुळे त्यांनी या अर्काचे अनेक प्रकार विकसित केले, ज्याचा उपयोग विविध आजारांसाठी केला जाऊ लागला. तसेच आयुर्वेद व निसर्गोपचार करणाऱ्या जाणकार डॉक्टरांकडून देखील या उत्पादनांचा चांगला उपयोग केला जात आहे. पंचगव्यघृत देखील तयार केले. यासोबत त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या खिलार गाईच्या मदतीने शेतीत देखील परिवर्तन घडवून आणले.

त्यांनी गाईसाठी वैरण देखील नैसर्गिक पद्धतीने कोणत्याही रसायनाच्या वापराशिवाय पिकवून तीच गाईसाठी वापरली. याशिवाय त्यांनी चिंचेची ३८ झाडे लावली. २५० आंब्याची बाग उभारली. यासाठी शेणखत व नैसर्गिक खतांचा उपयोग समाधान पाटील यांनी केला.

ठळक बाबी...

  • पंचगव्य निर्मिती प्रशिक्षणातून उत्पादन निर्मिती

  • १२ खिलार गाईंच्या मदतीने नैसर्गिक शेती

  • गोमूत्र व औषधी वनस्पतीच्या आधारे गोमूत्र अर्काची निर्मिती

  • एकूण संशोधित २१ गोमूत्र अर्काचे प्रकार विकसित

  • आजारांच्या उपचारासाठी उपयुक्त संशोधित अर्क

  • डॉक्टरांकडून गोमूत्र अर्काचा उपयोग

  • नैसर्गिक शेतीद्वारे २५० आंब्याची बाग

  • रसायनमुक्त पद्धतीने वैरण उत्पादन

गोमूत्र अर्काचे प्रकार

चंद्रमा गोधन अर्क, तुळशी अर्क, सर्पगंधा अर्क, गोखरू अर्क, कांचनार अर्क, पुनर्नवा अर्क, नारी अमृता अर्क, सप्तरंगी अर्क, अर्जुन गोमूत्र अर्क, शतावरी गोमूत्र अर्क, मंजिष्ठा गोमूत्र अर्क, पाषाणभेद गोमूत्र अर्क, पारिजातक गोमूत्र अर्क, गुळवेल गोमूत्र अर्क, ज्येष्ठमध गोमूत्र अर्क, वरुण साल गोमूत्र अर्क, गोमूत्र रक्तशुद्धी अर्क, गोमूत्र मधुमेहंतकारी अर्क, गोमूत्र नंदी अर्क, ब्राह्मी गोमूत्र अर्क व गोमूत्र नारी संजीवनी अर्क.

सातत्याने संशोधन करत असताना गोमूत्रासोबत औषधी वनस्पतींचा योग्य पद्धतीने उपयोग करून गोमूत्र अर्काचे संशोधित प्रकार विकसित केले आहेत. त्याचा उपयोग डॉक्टर व जाणकार करतात.

- समाधान पाटील, बेंबळे, ता. माढा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com