
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे २१८ सक्रिय रुग्ण
सोलापूर : शहर-ग्रामीणमधील कोरोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागला आहे. मृत्यूदरही नियंत्रणात आल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात सध्या २१८ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ग्रामीण भागातील अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर या तालुक्यात शनिवारी (ता. १९) एकही रुग्ण आढळलेला नाही. उर्वरित तालुक्यांमध्येही खूपच कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये एक लाख ८५ हजार ८०९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी बहुतेक रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या १७२ रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
त्यातील बहुतेक रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांच्याच घरी उपचार सुरु आहेत. दुसरीकडे शहरातील ३३ हजार ६३८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील आता ४६ रुग्ण सक्रिय आहेत. शहरातील ३० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून त्यांच्यावर त्यांच्याच घरी उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील अजूनही चार ते साडेचार लाख व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस घेतलेली नाही. जिल्ह्यातील सर्वांनी नियमांचे पालन केल्याने व प्रतिबंधित लस टोचल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्याची स्थिती आहे. तरीही, कोरोना गेल्याच्या अविर्भावात न राहता नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
Web Title: 218 Active Patients Of Corona In Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..